Air force Plane Crashes: सोमवारी सकाळी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तेलंगणातील दिंडीगुल येथील एअर फोर्स अकादमी येथे विमान क्रॅश झाल्याची घटना समोर आली आहे. प्रशिक्षणादरम्यान सकाळी 8:55 वाजता पायलट ट्रेनर विमान क्रॅश झाल्याचे वृत्त समोर आले. यामध्ये 2 भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
#WATCH | A Pilatus PC 7 Mk II aircraft met with an accident today morning during a routine training sortie from AFA, Hyderabad. Both pilots onboard the aircraft sustained fatal injuries. No damage to any civil life or property has been reported: Indian Air Force officials https://t.co/EbRlfdILfg pic.twitter.com/Eu65ldloo6
— ANI (@ANI) December 4, 2023
मृत्यूमुखी पडलेल्या वैमानिकांमध्ये एक प्रशिक्षक आणि एका कॅडेटचा समावेश असल्याची माहिती भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. हैदराबाद येथे नियमित प्रशिक्षणादरम्यान एका पायलट पीसी 7 Mk II विमानाला आज सकाळी अपघात झाला. यात दोन शिकाऊ वैमानिकांचा मृत्यू झालाय. दिंडीगुलच्या एअर फोर्स अॅकडमीमध्ये हा प्रकार घडलाय. प्रशिक्षण सुरू असताना सकाळी 8 वाजून 55 मिनिटाला विमान कोसळलं.