भारतातील सेंद्रिय उत्पादनांची जगभरात चर्चा; निर्यातीत वाढ

भारताबाहेरील अनेक देशांमध्ये सेंद्रिय उत्पादनांची वाढती मागणी...

Updated: Aug 10, 2020, 03:18 PM IST
भारतातील सेंद्रिय उत्पादनांची जगभरात चर्चा; निर्यातीत वाढ  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : भारतातील सेंद्रिय उत्पादनांची जगभरात चर्चा आहे. सेंद्रिय फळे, भाज्या, डाळी, मसाल्यांची मागणी सतत वाढत आहे. दरवर्षी निर्यात वाढत आहे. जुलैमध्ये भारताने अनेक देशांमध्ये 90,000 मेट्रिक टन सेंद्रिय उत्पादने निर्यात केली आहेत. बाहेरील देशांमध्ये सेंद्रिय उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असून उत्पन्नही वाढत आहे.

कृषी आणि प्रक्रिया केलेले खाद्य उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणने APEDA दिलल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात भारताने 89,995 मेट्रिक टन सेंद्रिय वस्तूंची निर्यात (organic products export) केली. APEDAनुसार, या उत्पादनाच्या निर्यातीला अमेरिका, कॅनडा (Canada), ऑस्ट्रेलिया (Australia), युरोपियन युनियन आणि मध्य पूर्व  (Middle East)या देशांत सेंद्रिय उत्पादनांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 

APEDAने सांगितलं की, गेल्या वर्षी जुलै महिन्यात सेंद्रिय उत्पादनांची निर्यात (organic products) 74 टक्के होती, या वर्षी जुलैमध्ये ती 78 टक्के झाली आहे. लॉकडाऊन काळातही निर्यात वाढली आहे. जुलैमध्ये भारत सरकारने 103 मिलियन डॉलर किंमतीची सेंद्रिय उत्पादने निर्यात केली.

सेंद्रिय उत्पादनांव्यतिरिक्त इतर कृषी उत्पादनांची निर्यातही वाढली आहे. बेंगळुरुच्या सीड्स प्रायव्हेट लिमिटेडने, इंग्लंड, नेदरलँड्स आणि ऑस्ट्रेलिया येथे 28.52 मेट्रिक टन इतकी  बेबीकॉर्न आणि मिरचीची निर्यात केली आहे.

वाणिज्य मंत्रालय आणि कृषी मंत्रालयाने संयुक्तपणे निर्यात संवर्धन मंच- ईपीएफची (Export Promotion Forum) स्थापना केली आहे. कृषी उत्पादनांच्या निर्यातीला, विशेषतः फलोत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे हे यामागचं उद्दीष्ट आहे.