नवी दिल्ली : Domino's पिज्जा कंपनीने आपल्या डिलिवरी पार्टनर्ससाठी सध्याच्या पेट्रोल मोटरसायकल इलेक्ट्रिकमध्ये बदलण्याचा निर्णय घेतला आहे. Domino's ने रत्तन इंडियाची सहाय्यक कंपनी रिवोल्ड मोटार्स कंपनीशी करार केला आहे. रिवोल्ड कंपनी इलेक्ट्रिक मोटारसायकल बनवणारी कंपनी आहे.
Domino's ने रविवारी म्हटले की, या पार्टनरशिप अंतर्गत Domino's Revolt च्या RV300 मॉडेलच्या सर्व इलेक्ट्रिक बाइक खरेदी करणार आहे. याशिवाय आपली फ्लीट वाढवण्यासाटी Domino's रिवॉल्डची कस्टमाइज बाइक देखील खरेदी करू शकते.
अनेक दिवसांपासून सुरू होता पायलट प्रोजेक्ट
कंपनीने सांगितले की, Domino's काही दिवसांपासून पायलट प्रोजेक्टच्या तत्वावर रिवॉल्डच्या मोटारसायकलने डिलिवरी करीत आहे. आता संपूर्ण चाचण्यांनंतर या पार्टनरशिपला हिरवा कंदील मिळाला आहे.
रत्तनइंडिया एंटरप्रायजेजचे बिझनेस चेअरमन अंजल रत्तन यांनी म्हटले आहे की, या पार्टनरशिपमध्ये Domino'sसोबत भागिदारी केल्याने पर्यावरणालाही फायदा होईल आणि Domino'sलाही आपला खर्च वाचवण्यास मदत मिळेल.