मुंबई : Twitterने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांच्या वैयक्तिक Twitt अकाऊंटची ब्लू टिक काढून टाकल्यानंतर ट्विटरने राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेच्या ( RSS) बड्या नेत्यांची Twitt अकाऊंटची ब्लू टिक (Blue Tick Badge) देखील हटवली आहे. यामुळे भारत सरकार आणि ट्विटरमधील तणाव वाढू शकतो. तथापि, ट्विटरने उपराष्ट्रपतींच्या अकाऊंटची ब्लू टिक काढण्याची चूक सुधारली आहे. आता त्यांच्या अकाऊंटची ब्लू टिक दिसत आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या (RSS) अनेक ज्येष्ठ आणि मोठ्या नेत्यांच्या ट्विटर (Twitter) अकाऊंटवरुन Blue Tick काढून टाकली गेली आहे. यात कृष्णा गोपाळ, सुरेश सोनी, सुरेश जोशी आणि अरुण कुमार यांचा समावेश आहे.
@TwitterIndia @verified removed blue ticks of these handles of @RSSorg office bearers. We are to get in touch but no one responds. Strange. So the vice-president @MVenkaiahNaidu is not the only one. @payalmehta100 @PayalKamat @misskaul @vikasbha @ravindrak2000 @nistula pic.twitter.com/ALOXvZ1yw0
— rajiv tuli (@rajivtuli69) June 5, 2021
यावर राजीव तुली यांनी ट्विट केले की, ट्विटर इंडियाने (Twitter India) आरएसएस नेत्यांच्या हँडलमधून Blue Tick हटवली आहे. यासाठी अद्याप कोणतेही कारण देण्यात आले नाही. हे खूप विचित्र आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हेच एकमेव नाहीत. अनेकांच्या अकाऊंटवरुन Blue Tick काढून टाकण्यात आलेली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयामार्फत आज ट्विटरला नोटीस पाठविली जाईल, अशी माहिती आहे. भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन Blue Tick हटविणे ही घटना म्हणजे भारतीय घटनात्मक पदाचा अवमान आहे.
दुसरीकडे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तरुण चुग म्हणाले की, आरएसएस अनेक दशकांपासून या देशात कार्यरत आहे. देशातील आदर्श राजकारणासाठी भाजप आणि आरएसएस उभे आहेत आणि आम्हाला कोणाच्याही ब्लू टिकची गरज नाही.