IAS अतहर आमिरच्या नव्या आयुष्याला सुरुवात, 'या' तरूणीसोबत झाली एंगेजमेंट!

IAS टीना डाबीनंतर आयएएस अतहर आमिरच्या आयुष्यात येणार 'ही' व्यक्ती, कोण आहे ब्युटी विथ ब्रेन गर्ल?

Updated: Jul 3, 2022, 03:44 PM IST
 IAS अतहर आमिरच्या नव्या आयुष्याला सुरुवात, 'या' तरूणीसोबत झाली एंगेजमेंट! title=

मुंबई : आयएएस टीना दाबी आणि आयएएस अतहर आमिर खान यांनी काहीच दिवसांपुर्वी घटस्फोट घेतला होता. या घटस्फोटानंतर टीना दाबी यांनी आयएएस प्रदीप गावंडेसोबत लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नानंतर आता आयएएस अतहर आमिर खान यांनी देखील डॉक्टर मेहरीन काझीसोबत एंगेजमेंट केली आहे. या एंगेजमेंटचे फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले आहेत.दरम्यान अतहर आमिरच्या आयुष्यात येणार 'ही' व्यक्ती आहे तरी कोण याची माहीती जाणून घेऊयात. 

टीना डाबीच्या लग्नाच्या दोन महिन्यांनंतर अतहर आमिरच्या एंगेजमेंटचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अतहर आमिरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एंगेजमेंटचा फोटोही शेअर केला आहे. त्याच वेळी, याच्या एंगेजमेंटचा संबंधित एक व्हिडिओ केके स्टुडिओने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 

टीना दाबीनंतर आता आयएएस अतहर आमिरही पुन्हा नव्या आयुष्याला सुरुवात करणार आहे. अतहर आमिर खान आता डॉक्टर मेहरीन काझीसोबत लग्न करणार आहे. अतहर डॉक्टर मेहरीन काझी यांच्याशी कधी लग्न करणार हे निश्चित झाले नसले तरी लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

कोण आहेत डॉ. मेहरीन काझी?

डॉ. मेहरीन काझी सध्या नवी दिल्लीतील राजीव गांधी कॅन्सर इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटरमध्ये कार्यरत आहेत. मेहरीन यांना ब्युटी विथ ब्रेनही म्हटले जात आहे.

डॉ. मेहरीन या वैद्यकीय क्षेत्रासोबतच फॅशन इंडस्ट्रीतही सक्रिय आहेत.त्या महिलांशी संबंधित ब्रँडचा प्रचार करतात. इंस्टाग्रामवर त्याचे दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

डॉ. मेहरीन यांनी ब्रिटन आणि जर्मनीमधून वैद्यकशास्त्रातील पदव्या घेतल्या आहेत. ती एक शिस्तप्रिय आणि आत्मविश्वासी डॉक्टर म्हणून स्वत:चे वर्णन करते. डॉक्टर मेहरीन यांनी मेडिसिनमध्ये एमडी ही पदवी घेतली आहे. 

डॉ. मेहरीन यांनी पंजाबमधील फरीदकोट आणि दिल्लीतील आंबेडकर विद्यापीठासह यूके आणि जर्मनीमधून शिक्षण घेतले आहे.