SBI कडून मोठा बदल, या नियमांचा तुमच्या व्यवहारावर देखील होऊ शकतो परिणाम

ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकरण लक्षात घेऊन बँकेने YONO ऍपमध्ये हे नवीन अपग्रेड ठेवले आहे.

Updated: Jul 3, 2022, 02:37 PM IST
SBI कडून मोठा बदल, या नियमांचा तुमच्या व्यवहारावर देखील होऊ शकतो परिणाम title=

मुंबई :  तुम्हीही देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI चे ग्राहक असाल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. बँकेने ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन महत्त्वाचे बदल केले आहेत. या बदलांतर्गत, आता ग्राहक फक्त त्याच फोनवरून SBI च्या YONO ऍप्लिकेशन लॉग इन करू शकतात ज्याचा मोबाईल नंबर बँकेत नोंदणीकृत असेल. म्हणजेच आता तुम्ही इतर कोणत्याही क्रमांकावरून बँकेची सेवा घेऊ शकत नाही.

बरेच असे ग्राहक आहेत, ज्यांचा बँकत खात्याला लिंक केलेला फोननंबर हा वेगळा आहे आणि ते वेगळ्याच फोनवरुन YONO ऍप्लिकेशन लॉग इन करून वापरत आहेत. परंतु बँकेने ग्राहकांची सिक्योरीटीपाहून हे पाऊल उचलले आहे, ज्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग फसवणुकीपासून वाचवता येईल.

विशेष म्हणजे, देशातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी सुविधा देत असते. आता ऑनलाइन फसवणुकीचे वाढते प्रकरण लक्षात घेऊन बँकेने YONO ऍपमध्ये हे नवीन अपग्रेड ठेवले आहे. यामुळे, ग्राहकांना केवळ एक सुरक्षित बँकिंग अनुभव मिळणार नाही तर ते ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणे देखील टाळतील. एवढेच नाही तर ग्राहकांच्या खात्याची सुरक्षाही वाढणार आहे.

बँकेच्या या निर्णयामुळे तुमचा पासवर्ड आणि बँक डिटेल जरी ठग्यांकडे असली, तरी ते दुसऱ्या कोणत्याच फोन किंवा डिवाइसमध्ये तुमचं अकाउंट उघडून तुमचे पैसे काढू शकत नाहीत.

परंतु यामुळे जे लोक खरोखर काही कारणास्तव दुसऱ्या मोबाईलमधून लॉगईन करण्याचा प्रयत्न करेल, त्यांना आता ते करता येणार नाहीय.