नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आर्थिक बजेट सादर केल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. बजेटनंतर सोनं 1500 रूपयांनी कमी झालं आहे. त्यामुळे आता ग्राहकांना सोने खरेदीसाठी 48 हजार 123 रूपये मोजावे लागणार आहे. मल्टी कमोडीटी एक्चेंजवर (Multi commodity exchange) मोठी उलथापालथ झाली आहे. अर्थमंत्र्यांनी सोने आणि चांदीचे आयात दर 2.5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेच सोन्याच्या दरात घसरण झाली.
अर्थमंत्र्यांनी कस्टम ड्यूटीत ५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोने खरेदीकडे येत्या काही दिवसांत लोकांचा कल वळणार आहे. परिणामी सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.
MCXने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सोन्याचे दर 274 रूपयांनी वधारले होते. तर सकाळी जवळपास नऊच्या सुमारास 185 रूपयांच्या वाढीसह 49 हजार 281 रुपयांवर पोहोचला. तर दुसरीकडे चांदीचे दरही वाढले. पण बजेत संपताच सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे सर्वच क्षेत्रात आर्थिक चणचण भासत होती. सोन्याच्या दरातही चढ-उतार पाहायला मिळाला. सोन्याच्या दरात होत असलेल्या चढ-उतारामुळे सोन्यात गुंतवणूक करायला हवी की नको असा प्रश्न ग्राहकांना पडला होता. मात्र आता बजेट सादर झाल्यानंतर सोन्याचे दर खाली आले आहेत. म्हणून सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचे पाय सोन्याच्या दुकानाकडे वळणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.