नवी दिल्ली: नव्या आर्थिक वर्षाचं अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलं. या अर्थसंकल्पात आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधांवर अधिक भर देण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान जाहीर केले की सरकार लवकरच जीवन विमा महामंडळाचा आयपीओ आणणार आहे.
IPO ही संकल्पना मोदी सरकारनं मागच्याच वर्षी जाहीर केली होती. मात्र कोरोनामुऴे ती पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे या आर्थिक वर्षात सरकार ही योजना राबवण्यावर भऱ देणार आहे.
IPO ही संकल्पना काय?
गेल्या वर्षीप्रमाणेच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यंदाच्या अर्थसंकल्पीय भाषणात एलआयसीच्या आयपीओचा उल्लेख केला आहे. LIC शेअर बाजारात रजिस्टर करेल. IPOद्वारे कंपनीचे आर्थिक मूल्य शोधता येणार आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या होत्या की, एलआयसी संपूर्णपणे सरकारच्या मालकीचे राहील. यादीनंतर आयपीओच्या माध्यमातून कंपनीची आर्थिक स्थिती निश्चित केली जाईल. त्यामुळे गुंतवणूकदार LICचे शेअर्स घेतील.
IPOद्वारे LICच्या शेअर्सची किंमत ठरवली जाणार आहे. त्यामुळे आता शेअर बाजारात LICचे शेअर्समध्ये नागरिकांना गुंतवणूक करता येणार आहे.