Name In Voter List : वयाची 18 वर्षे पूर्ण झाली की भारतीय व्यक्ती आपला मतदानाचा हक्क बजावू शकतो. मात्र, फक्त वयाची 18 वर्ष होऊन चालत नाही. मतदानाचा हक्क बजावता यासाठी संबधीत व्यक्तीला नाव मतदार यादींच नोंदवणे बंधकारक असते. मतदार यादीत नाव नोंदवल्यानंतर संबधीत व्यक्तीला व्होटर आय डी कार्ड अर्थात मतदार ओळखपत्र मिळते. यानंतरच संबधीत व्यक्ती मतदान करु शकतो. मतदार यादीत नाव नोंद नसल्यामुळे अनेकांना मतदान करता येत नाही. मात्र, मोदी सरकार एक अशी जबरदस्त योजना आणणार आहे. वय 18 वर्षे झालं की आपोआप नाव मतदार यादीत नोंदवलं जाणार आहे.
मोदी सरकार एक जबरदस्त प्लान तयार करत आहे. वय 18 वर्षे झालं की आपोआप नाव मतदार यादीत नोंदवलं जावे याकरीता केंद्र सरकार नवं विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. वयाची 18 वर्षे पूर्ण होताच आपोआप मतदार यादीत समाविष्ट होईल. एवढेच नाही तर एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याचे नाव मतदार यादीतून आपोआप काढून टाकले जाईल.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणना इमारतीचे उद्घाटन करताना ही घोषणा केली होती. जन्म आणि मृत्यू नोंदणी मतदार यादीशी जोडण्याची तरतूद असेल असे विधेयक सरकार आणणार असल्याचे शहा यावेळी म्हणाले होते.
या विधेयकात व्यक्तीची जन्म तारीख, वय आणि मृत्यू यांची नोंद थेट मतदार यादीशी होईल अशी तरतूद असणार आहे. ही सर्व माहिती निवडणुक आयोगाला उपलब्ध करुन दिली जाईल. यामुळे वयाची 18 वर्षे पूर्ण होताच आपोआप मतदार यादीत समाविष्ट होईल. तसेच मृत्यू झाल्यास हे नाव हटवले देखील जाईल अशी तरतूद केली जाणार आहे.
खास मतदार नोंदणीसाठी असलेल्या या विधेयकाचा फायदा लायसन्स आणि पासपोर्ट मिळवण्यासाठी देखील होणार आहे. जन्म आणि मृत्यू नोंदणी कायदा, 1969 मध्ये सुधारणा करण्यासाठी विधेयक फायदेशीर ठरणार आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंतची तारीख जनगणनेशी जोडली जाईल. मुलाच्या जन्मासोबतच त्याची तारीखही जनगणना कार्यालयात नोंदवली जाणार आहे. यामुळेच वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर नाव आपोआप मतदार यादीत समाविष्ट होईल. तसेच मृत्यू झाल्यावर त्याचा डेटा आपोआप हटवला जाईल.