Adani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर'

Hindenburg vs Adani: हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत.

Updated: Feb 8, 2023, 01:22 PM IST
Adani Enterprise: झुकेगा नहीं... हिंडनबर्गचा पंच खिळखिळा? शेअर बाजारात अदानी 'सुपर से भी उपर' title=

Gautam Adani Comeback In Share Market: गेल्या काही दिवसांपासून गौतम अदानी यांना धक्क्यांवर धक्के मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. हिंडनबर्गच्या अहवालानंतर (Hindenburg Report) गौतम अदानींचे सर्वात श्रीमंत यादींवरून नाव खाली आहे आणि त्याच्या संपत्तीही क्षणार्धात कमी झाली. हा मोठा बदल आपण माध्यमांतून पाहिलाच आहे. त्यामुळे अदानी ग्रुपवरती मोठी टांगती तलवार लागल्याचेही पाहायला मिळाले आहे. त्यातून हा हिंडनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानींच्या शेअर्समध्येही मोठी घसरण पाहायला मिळाली. राजकारण्यांमध्येही मोठ्या प्रमाणात अदानींवरून गदारोळ झालेला पाहायला मिळतो आहे. (Adani Enterprises shares crossed 2 thousand today, and Adani port performed good as well latest stock market news)

त्यामुळे सध्या विरोधी पक्षांमध्येही अदानींचा (Opposition on Gautam Adani) विषय पकडून धरला जातो आहे. परंतु अदानींना यापाठोपाठ सुखद धक्केही मिळताना दिसत आहेत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे गौतम अदानींच्या अदानी एन्टरप्राईजमध्ये मोठ्या प्रमाणात तेजी पाहायला मिळते आहे. 

हिंडनबर्गच्या अहवालानंतर अदानी ग्रुपची अवस्था कशी झाली हे आपण सर्वांनीच पाहिले परंतु आता जी बातमी समोर येते आहे त्यानं तुम्हालाच धक्का बसेल. आता अदानींच्या धक्कानंतर अवघ्या काही दिवसातच गौतम अदानीं सावरताना दिसत आहेत. हा अहवाल आल्यानंतर 3 फेब्रुवारीला अदानी एन्टरप्रायजेसचा शेअर 1095 रूपयांनी घसरला होता. तो शेअर आज 2 हजारचा टप्पा पार करतो आहे. हे आकाडे झाले अदानी एन्टरप्राईजचे (Adani Enterprise) आहेत. परंतु अदानींच्या अदानी पोर्ट्समध्येही मोठी चढाव झाल्याचे पाहायला मिळते आहे. अदानी पोर्टच्या (Adani Ports) शेअरमध्ये 149 रूपयांची वाढ झाली आहे. 

काय होता हिंडनबर्गचा धक्का? 

हिंडनबर्ग रिचर्स (Hindenburg Report) या अमेरिकेतील कंपनीनं अदानी समूहावर शेअर मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग द्वारे घोटाळा केला असल्याचे म्हटले होते. ज्याचा फटाका अदानी ग्रुपला मोठ्या प्रमाणात बसला होता. त्यामुळे अदानी ग्रुपचे शेअर्स हे जोरदार खाली कोसळले. शॉर्ट सेलिंगचा मोठा फायदा कंपन्यांना होता परंतु येथे मोठ्या प्रमाणात शॉर्ट सेलिंग केले गेल्याचे आरोप हिंडनबर्ग या कंपनीनं त्यांच्या अहवालातून केले होते. याचे प्रामुख्यानं दोन परिणाम अदानीं भोगावे लागले होते.

एक मोठा परिणाम म्हणजे जगातील श्रीमंतांच्या यादीतून म्हणजे टॉप - 20 मधून (Top 20 Rich People List) बाहेर आले. या अहवालाचा फटका हा फार मोठा होता. या अहवालाच्या आधीचा अदानींचा एक शेअर हा 3,800 रूपये इतका होता तोच शेअर आता 1095 वर आला आहे. म्हणजे हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर हा शेअर दोन हजारनं कमी झाला होता जो आता त्याच्याही पुढे गेला आहे. 

अदानींचा शेअर 2 हजारपार! 

अदानींना इतका मोठा फटका बसल्यानंतर अदानींना 5 दिवसांतच आपला शेअर हा 1095 वरून 2 हजारपार नेला आहे. त्यामुळे अदानी आता या धक्क्यांतून सावरताना दिसत आहे. 1095 हा त्यांचा घसरलेला शेअर होता. रेटिंग एजन्सी फीच आणि मुडीज (Fitch Report) यांनी सादर केलेल्या अहवालानूसार, अदानी ग्रुप यांनी SBI कडून घेतलेली कर्ज ही काही फार मोठी नाही. त्याच्या त्यांच्या पत धोरणाला काही मोठा तोटा नाही. अदानींचा पावर शेअर हा 5 टक्क्यांनी वाढला आहे. ज्याचा परिणाम हा त्यांच्या शेअरमध्ये मोठी वाढ निर्माण करतोय हाच त्यांचा शेअर 181.90 वर गेला आहे.