बहुचर्चित खासदार नुसरत जहाँचा चिमुरड्यासोबतचा फोटो व्हायरल

फोटो चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे.... 

Updated: Dec 11, 2019, 04:45 PM IST
बहुचर्चित खासदार नुसरत जहाँचा चिमुरड्यासोबतचा फोटो व्हायरल  title=

मुंबई : अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या आणि सध्याच्या घडीला खासदारकी भुषवणाऱ्या नुसरत जहाँ या पुन्हा एकदा अनेकांचं लक्ष वेधत आहेत. त्या चर्चेत येण्याचं कारण ठरत आहे, सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या एक फोटो. नुसरत यांनी नुकताच एक फोटो सर्वांच्या भेटीला आणला आहे. या फोटोमध्ये त्यांचा वेगळाच अंदाज पाहायला मिळत आहे. 

नुसरत जहाँ यांनी शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांच्यासोबत कोणी सेलिब्रिटी किंवा ओळखीचा चेहरा दिसत नाही आहे. असं असतंल तरीही हा चेहरा मात्र त्यांच्या मनाला चांगलाच भावला आहे, असं म्हणायला हरकत नाही. 'आठवड्याचा शेवट खास झाला.... तेसुद्धा या खास चेहऱ्यासह. जवळपास दीड वर्षांचा हा मुलगा फुगे विकतो. त्याच्या चेहऱ्यावर असणारे निरागसतेचे रंग हे त्या फुग्यांच्या रंगांपेक्षाही जास्त रंगीत आहेत....', असं लिहित सर्वांवर प्रेम करण्याचा आणि प्रेम ही एकमेव भाषा असल्याचा संदेश जहाँ यांनी सर्वांनाच दिला. 

धकाधकीच्या जीवनात काही गोष्टी मिळवण्यासाठी त्या दिशेने धावणाऱ्या आपल्या जीवनात मिळालेल्या काही क्षणांचा आनंद घेण्याचा नुसरत जहाँ यांचा हा अंदाज अनेक नेटकऱ्यांची मनं जिंकून गेला. कमेंटमध्ये काहींनी तिच्या या मनमिळाऊ वृत्तीची दाद दिली तर कोणी तिचा हा अंदाज भावल्याचं म्हटलं. 

लोकसभेच्या सत्रांमध्ये चर्चेत असणाऱ्या नुसरत जहाँ यांनी खऱ्या अर्थाने सोशल मीडिया वर्तुळातही त्यांची वेगळी ओळख केली आहे, असं म्हणायला हरकत नाही. पश्चिम बंगाल येथून बसिरहाट मतदार संघातून त्या तृणमूल काँग्रेसच्या वतीने लोकसभेत निवडून गेल्या होत्या. बंगाली कलाविश्वातून त्यांच्याप्रमाणेच आणखी एका चेहऱ्याचीही राजकीय वर्तुळात अनेकदा चर्चा होते. तो चेहरा म्हणजे जाधवपूर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या मिमी चक्रवर्ती.