आनंद महिंद्रा यांनी मंगळावरून काढलेला पृथ्वीचा फोटो शेअर केला, पहा मंगळावरून कशी दिसते पृथ्वी...

जर टेक कंपनीच्या सीईओने एखादी पोस्ट शेअर केली असेल तर त्यामध्ये काहीतरी नवीन आणि खास नक्कीच असणारच......

Updated: Jul 24, 2022, 04:45 PM IST
आनंद महिंद्रा यांनी मंगळावरून काढलेला पृथ्वीचा फोटो शेअर केला, पहा मंगळावरून कशी दिसते पृथ्वी...  title=

Aanand mahindra shares earth photo :  प्रसिद्ध टेक कंपनी महिंद्रा ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आनंद महिंद्रा हे अशा काही सेलिब्रिटींपैकी एक मानले जातात ज्यांच्या डोळ्यांना मर्मज्ञांचे डोळे म्हटले जाते. महिंद्रा सोशल मीडियावर नेहमीच ते सक्रिय असतात अनेकदा अशी काही फोटो ते  युजरसोबत शेअर करत असतात, जी दिसायला अगदी सामान्य असतात, पण जर त्यामध्ये खोलवर अर्थ असतो. 

अशीच एक पोस्ट आनंद महिंद्रा यांनी शेअर केली आहे जी काही वेळातच व्हायरल झाली. प्रत्येक पोस्टप्रमाणेच ही पोस्ट देखील उद्योगपतीने  रिट्विट केली होती. आता  जर टेक कंपनीच्या सीईओने एखादी पोस्ट शेअर केली असेल तर त्यामध्ये काहीतरी नवीन आणि खास नक्कीच असणारच  तर मग जाणून घेऊया! आनंद महिंद्राच्या या शेअर पोस्टची खासियत काय आहे?

 महिंद्राने ट्विटरवर पृथ्वीचे एक छायाचित्र शेअर केले आहे जे मंगळावरून घेतलेले आहे

जो क्युरिऑसिटी नावाच्या ट्विटर पेजने शेअर केला आहे. पण महिंद्राने त्यांच्या पोस्टसोबत जे लिहिले आहे ते अतिशय आकर्षक आणि विचार करायला लावणारे कॅप्शन आहे जे प्रत्येक सोशल मीडिया युजरने एकदा पहावे.

ज्यामध्ये त्यांनी नम्रतेबद्दल बोलले आहे, त्यांनी लिहिले आहे की, "या चित्रातून एकच गोष्ट शिकली पाहिजे, ती म्हणजे नम्रता." हे आश्चर्यकारक चित्र नासाच्या माध्यमातून मंगळावरून प्रत्यक्षात घेण्यात आले होते. होय, मंगळ आणि तो लहान ताऱ्यासारखा पांढरा ठिपका म्हणजे आपली प्रिय पृथ्वी.

या पोस्टवर लोकांनी आपली मते द्यायला सुरुवात केली आणि अनेक कमेंट्स केल्या. एका युझरने तर मंगळाला येणाऱ्या पिढ्यांसाठी 'सेल्फी पॉइंट' म्हटले आहे. एका युझरने लिहिलयं, "आम्ही या संपूर्ण विश्वातील धुळीचा एक छोटासा कण आहोत!"