आफताबला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नाही; तुरुंगात करतोय 'या' गोष्टीची मागणी

श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही...असं म्हणणारा आफताब तुरुंगातही टेन्शन फ्री... पोलिसांकडे केली 'या' गोष्टीची मागणी  

Updated: Dec 4, 2022, 10:31 AM IST
आफताबला त्याच्या कृत्याचा पश्चाताप नाही; तुरुंगात करतोय 'या' गोष्टीची मागणी title=

Shraddha Walker Case : श्रद्धाच्या (shraddha walker)  मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही... फाशीची शिक्षा झाली तरी काही हरकत नाही, मला स्वर्गात आणखी अप्सरा भेटतील.... असं म्हणणारा आफताब पुनावाला (Aaftab Poonawala) गर्लफ्रेंडची हत्या केल्या प्रकरणी तुरुंगात आहे. तुरुंगातील आफताबची वागणूक पाहून पोलीस देखील सुन्न झाले आहेत. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आफताबने तिहार तुरुंग प्रशासनाकडे कादंबरी आणि पुस्तकं देण्याची मागणी केली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Shrdhha Wallker case)

आफताबच्या विनंतीनंतर तिहार तुरुंग प्रसाशनाने आरोपीला पॉल थेरॉक्स याचं 'द ग्रेट रेल्वे बाजार' हे पुस्तक वाचायला दिलं आहे. तुरुंग प्रसाशनाने  सांगितलं, 'सध्या आम्ही आफताबला पॉल थेरॉक्स यांचं 'द ग्रेट रेल्वे बाजार' पुस्तक दिलं आहे. हे पुस्तक आमच्याच ग्रंथालयातील आहे. 'द ग्रेट रेल्वे बाजार' पुस्तक वाचून झाल्यानंतर त्याला अन्य पुस्तकं देखील उपलब्ध करण्यात येतील...' (shraddha walker age)

आफताबला 12 नोव्हेंबरला अटक करण्यात आली होती. आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. महत्त्वाचं म्हणजे कोठडीमध्ये आफताबसोबत अन्य दोन कैद्यांना ठेवण्यात आलं असून दोघांना 24 तास त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सांगण्यात येत आहे. आफताबच्या सेल बाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. (Aaftab Poonawala demand books from police)

तुरुंगात आफताब कोणाशीच बोलत नसून एकटा राहत असल्याची माहिती समोर येत आहे. (aftab instagram) तुरुंग अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब तुरुंगात जेवतो आणि झोपतो. आफताबला केलेल्या कृत्याची जरा देखील खंत नाही. श्रद्धाची हत्या देखील त्याने क्रूर चाल खेळून केली असल्याचं सांगण्यात येत आहे. 

श्रद्धाची हत्या केल्यानंतर काय म्हणाला आफताब

श्रद्धाची हत्या (shraddha walker story) करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केल्याचा मला कोणताही पश्चाताप नाही...  'आफताह म्हणाला श्रद्धाच्या हत्या प्रकरणात फाशी झाली तरी हरकत नाही. स्वर्गात गेल्यानंतर मला आणखी अप्सरा भेटतील.'  असं देखील आफताब चौकशी दरम्यान म्हणाला. 

आफताच्या या गुन्ह्यानंतर संपूर्ण देशात वातावरण तापलं आहे. आफताबला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे आफताबला त्याने केलेल्या गुन्ह्याची कोणतीही खंत नाही. तुरुंगात (Tihar Jail) देखील तो टेन्शन फ्री आयुष्य जगत आहे.