Ration Card : रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुमच्याकडेही रेशनकार्ड असेल आणि तुम्हाला दर महिन्याला मोफत धान्य मिळेत असल तरी मोठी अपडेट आहे. रेशन कार्ड आणि आधार लिंक केले नसेल तर तात्काळ करुन घ्या. रेशनकार्ड आधारशी लिंक करण्याची मुदत वाढविण्यात आली असून आता 30 जूनपर्यंत 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे. या तारखेपर्यंत तुम्ही दोन्ही कार्ड एकमेकांशी लिंक करुन मोफत धान्याचा लाभ घेऊ शकता.
केंद्र सरकारने रेशनकार्ड आधारशी लिंक करण्याचे आदेश दिले होते. यासाठी 31 मार्च 2023 ही अंतिम तारीख होती. आता आधार आणि रेशन कार्ड लिंक 30 जूनपर्यंत 2023 पर्यंत करता येणार आहे. त्यामुळे तुमच्या हातात तीन महिन्यांचा कालावधी असणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख वाढवण्याची अधिसूचना देखील जारी केली आहे. आता ही तारीख 30 जून केली आहे. रेशनकार्ड आणि आधार कार्ड लिंक केल्यानंतर खरच गरजूंना त्यांच्या वाट्याचे धान्य मिळत आहे की नाही याची माहिती मिळणे सोपे होणार आहे.
रेशन कार्ड आणि आधार लिंक करण्यासाठी तारीख दुसऱ्यांदा वाढवण्यात आली आहे. 31 मार्च 2023 पूर्वी आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत होती. आता ही मुदत वाढविण्याची दुसरी वेळ आहे. सरकारने रेशनकार्डला 'वन नेशन-वन रेशन' अशी घोषणा केल्यापासून रेशनकार्ड आधारशी जोडण्यावर भर दिला जात आहे. संबंधित गरजू व्यक्तिंना मोफत धान्य योजनेचा लाभ मिळत आहे का, यासाठी आधारशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
सरकारच्या नव्या धोरणानुसार अर्थात 'वन नेशन-वन रेशन' यामुळे रेशनकार्डच्यामाध्यमातून कोठूनही धान्य घेता येणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत तात्पुरत्या कामाच्या ठिकाणी रेशनपासून वंचित असलेले लोकांना याचा लाभ मिळू शकणार आहे.
- तुम्ही ऑनलाइन रेशनकार्डसोबत आधार लिंक करू शकता.
- तुमच्या राज्याच्या अधिकृत सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) पोर्टलला भेट द्या.
- अपडेट कार्डसह आधार लिंक निवडा.
- तुमचा रेशन कार्ड नंबर टाका आणि त्यानंतर आधार कार्ड नंबर टाका.
- तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाका.
- सबमिट बटण निवडा आणि क्लिक करा
- आता तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनवर एक ओटीपी मिळेल.
- आधार रेशन लिंक पेजवर OTP एंटर करा आणि तुमची विनंती आता सबमिट करा.
- प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्हाला त्याबद्दल माहिती देणारा एसएमएस प्राप्त होईल.