Aadhaar-PAN link News In Marathi: आयकर विभाग (Income Tax) अनेकदा पॅनकार्डसंदर्भात नवीन माहिती अपडेट करत असतं. पण गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभाग पॅनकार्डसंदर्भात एक गोष्ट वारंवार सांगत आहे, ती म्हणजे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करा. ट्विट करून आयकर विभागाने पुन्हा एकदा सर्वांना पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची आठवण करून दिली आहे. मात्र, ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सल्ला ही आयकर विभागाने दिला आहे. आता त्याची अंतिम मुदत अगदी जवळ येऊन ठेपली असून या दोन्ही कार्डची जोडणी करण्यासाठी आता काही दिवसच उरले आहेत.
भारतीय आयकर विभागाने पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. या दोन्ही कार्डची जोडणी करण्यासाठी आता काहीच दिवस उरले असताना ज्यांना उशीराने जाग आली, त्यांना मात्र आता एका अडचणीचा सामना करावा लागत आहे. या अडचणीमुळे दोन्ही कार्ड लिंक करणे अवघड झाले आहे. मात्र आयकर विभागाने या समस्येवर एक उपाय सांगितला असून ही अडचण दूर होताच अनेकांनी दोन्ही कार्ड जोडता येतील. नाहीतर मुदत संपल्यानंतर त्यांना दंड भरावा लागेल.
Kind Attention PAN holders!
While linking PAN with Aadhaar, demographic mismatch may occur due to mismatch in:
• Name
• Date of Birth
• GenderTo further facilitate smooth linking of PAN & Aadhaar, in case of any demographic mismatch, biometric-based authentication has… pic.twitter.com/UQuFnjda38
— Income Tax India (@IncomeTaxIndia) June 24, 2023
आयकर कायदा 1961 अंतर्गत पॅन कार्ड, आधार कार्डशी जोडणे आवश्यक करण्यात आले आहे. 30 जून 2023 पर्यंत अंतिम तारीख देण्यात आली आहे. लिंक न केल्यास पॅन कार्ड बंद होईल. या दोन्ही कार्ड लिंक करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता ती मुदत वाढणे अशक्य आहे. ही मुदत संपल्यानंतर जोडणी करणाऱ्यांना 1 जुलैनंतर 1000 रुपये दंड भरावा लागणार आहे.
अनेक जण अंतिम मुदतपूर्वी हे दोन्ही कार्ड जोडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण या एका चुकीमुळे त्यांची दोन्ही कार्डे जोडण्यास अडचण येत आहे. आधार कार्डवरील नाव, जन्मतारीख, लिंग अशी डेमोग्राफिक माहिती आणि पॅन कार्डवरील माहिती मिसमॅच होत आहे. ती जुळत नसल्याने दोन्ही कार्ड जुळत नसल्याने जोडण्यात अडचण येत आहे. परंतु दोन्ही कार्डावरील माहिती सारखी असेल तरच समस्या सुटू शकते.
जर तुम्ही दोन्ही कार्डमधील नाव, जन्मतारीख आणि इतर चुका आधीच दुरुस्त केल्या असतील तर तुमचे दोन्ही कार्ड लिंक केले जातील. तरीही समस्या कायम राहिल्यास विभागाने ती प्राप्त केल्यानंतर त्यावर उपाय सुचविले आहेत. तुम्ही फक्त पॅन सेवा पुरवठादारांच्या केंद्रांवरच समस्या सोडवू शकता. तुम्ही फी भरून सर्वोत्तम बायोमेट्रिक प्रमाणीकरण सुविधा मिळवू शकता.