Aadhaar क्रमांक वापरून तुम्ही पैसे पाठवू शकता, जाणून घ्या पैसे पाठविण्याची संपूर्ण प्रक्रिया !

Send Money using Aadhaar: Aadhaar क्रमांक वापरून पैसे पाठवू शकता. पैसे हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Updated: Oct 6, 2021, 07:40 AM IST
Aadhaar क्रमांक वापरून तुम्ही पैसे पाठवू शकता, जाणून घ्या पैसे पाठविण्याची संपूर्ण प्रक्रिया !  title=

मुंबई : Send Money using Aadhaar:  तुम्हाला एखाद्याला डिजिटल पेमेंट करायचे आहे, परंतु ज्या व्यक्तीला तुम्ही पैसे देऊ इच्छिता त्याच्याकडे फोन किंवा UPI अ‍ॅड्रेस नसेल तर. मात्र, अशा परिस्थितीत जर तुम्ही भीम (BHIM) यूजर असाल, तर तुम्ही रिसीव्हरचा Aadhaar क्रमांक वापरून पैसे पाठवू शकता. पैसे हस्तांतरणाची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI)  अधिकृत वेबसाइटनुसार, आधार क्रमांकाचा वापर करून पैसे पाठवण्याचा हा पर्याय लाभार्थीच्या BHIM अ‍ॅपवर स्पष्टपणे दिसतो. भीम अ‍ॅपद्वारे कोणालाही पैसे पाठवताना तुम्ही आधार क्रमांकाचा पर्याय वापरू शकता.

यूआयडीएआयच्या (UIDAI)  वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भीम अ‍ॅपमध्ये आधार क्रमांक वापरून पैसे पाठवण्यासाठी तुम्हाला लाभार्थीचा आधार क्रमांक टाकावा लागेल आणि व्हेरिफाई बटणावर क्लिक करावे लागेल. यानंतर प्रणाली त्या आधार क्रमांकाच्या लिंकिंगची पडताळणी करेल आणि ती रक्कम लाभार्थीला देईल.

यूआयडीएआयच्या (UIDAI)  मते, भीम अ‍ॅपवर आधार क्रमांकावरून पैसे पाठवताना, लाभार्थीला त्याचे डीबीटी/आधार (DBT/Aadhaar) आधारित क्रेडिट मिळवण्यासाठी निवडलेल्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित केल्यानंतर जमा केले जातील. या व्यतिरिक्त, तुम्ही आधार नंबर आणि फिंगरप्रिंट वापरून व्यापाऱ्यांना डिजिटल पेमेंट करू शकता. जे पेमेंट प्राप्त करण्यासाठी आधार पे पीओएस (Aadhaar Pay POS) वापरतात.

अशीही प्रकरणे आहेत जिथे एखाद्या व्यक्तीचे एकापेक्षा जास्त बँक खाते आहे आणि सर्व आधारशी जोडलेले आहेत. अशा परिस्थितीत, सर्व खाती डिजिटल पेमेंट करण्यासाठी वापरली जाऊ शकतात. आधार क्रमांक वापरून पेमेंट करताना, तुम्हाला ज्या बँकेकडून पेमेंट करायचे आहे, ते निवडण्याचा पर्याय तुम्हाला दिला जाईल. आधारद्वारे पेमेंट (Aadhaar Pay) केल्यावर तुमच्या बँक खात्यातून लगेच पैसे डेबिट केले जातील.