Aadhar Card News: आधार कार्ड आता सगळीकडे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे आधार आता जन्म-मृत्यू नोंदणीसाठी बंधनकारक नाही, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. केंद्र सरकारने रजिस्ट्रार जनरल (RGI) कार्यालयाला देशात जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीदरम्यान आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा नोंदणीसाठी आधार अनिवार्य असणार नाही, असे स्पष्ट केले आहे. 27 जून रोजी प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने RGI कार्यालयाला जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या ओळख तपशीलांचे प्रमाणीकरण करण्यासाठी आधार डेटाबेस वापरण्याची परवानगी दिली आहे.
जन्म आणि मृत्यूची नोंदणी अधिनियम 1969 अंतर्गत नमूद करण्यात आली आहे. नियुक्त केलेल्या रजिस्ट्रारला जन्म किंवा मृत्यूच्या अहवालात मागितलेल्या इतर तपशीलांसह आधार क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी ऐच्छिक असणार नाही. मात्र, तुम्हाला जर आधार प्रमाणीकरण करण्याची परवानगी दिली जाईल.
आधार जन्म नोंदणी ही मुलाची ओळख प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते, जन्माच्या बाबतीत पालक आणि माहिती देणारा आणि जन्म आणि मृत्यूच्या नोंदणी दरम्यान प्रदान केलेल्या बाबतीत पालक, जोडीदार आणि माहिती देणाऱ्याची ओळख स्थापित करण्याच्या उद्देशाने असू शकते, असे सांगण्यात आले आहे.
देशभरात कोठेही मुलाचे जन्म झाल्यास किंवा कुटुंबात एखाद्याचा मृत्यू झाला असल्यास, याची नोंद जन्म-मृत्यू रजिस्ट्रारच्या कार्यालयात करणे आवश्यक आहे. खेड्यातील ग्राम पंचायत कार्यालयात आणि आपले घर शहरी भागात असल्यास, नगरपालिका, नगर परिषद किंवा महानगपालिकेच्या कार्यालयात नोंदणी करु शकता.
राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन आधार प्रमाणीकरणाच्या वापराबाबत मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करतील. 2020 मध्ये, मंत्रालयाने नियम अधिसूचित केले होते. त्यात असे नमूद करुन केंद्र सरकार आधार प्रमाणीकरणास अनुमती देऊ शकते. आपल्यापैकी अनेकांना जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेबद्दल माहीत असते. पण नवीन अपडेट्स असे आले आहेत की, आता जन्म आणि मृत्यूच्या नोंदणीसाठी आधार क्रमांकाची काहीच आवश्यकता नाही. बऱ्याच लोकांनी या प्रक्रियेसाठी आधार नंबर गरजेचा असण्यावर आक्षेप घेतला होता. आता आधार क्रमांकाच्या शिवाय देखील जन्म आणि मृत्यूची नोंदणी केली जाऊ शकते.
जन्म-मृत्यू नोंद ही संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे आणि जन्म किंवा मृत्यूच्या 21 दिवसाच्या आत कुटुंबातील कोणताही सदस्य याची नोंदणी करु शकतो. 21 ते 30 दिवसाच्या आत 2 रुपयांचे विलंब शुल्क द्यावे लागते तर 30 दिवस ते 1 वर्षाच्या आत नोंदणी केल्याने नोटरीकडून पत्र सत्यापित करुन जिल्हा सांख्यिकी अधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हा नोंदणी अधिकारी किंवा विकास अधिकाऱ्याकडून प्रतिज्ञापत्र सही करुन घ्यावे लागते.