अनंतपूर : हात जोडणाऱ्या एका पोलिसाचा फोटो सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होत आहे. एका बाईकवरून पाच जण हेल्मेट न घालता जात असल्यामुळे पोलिसानं हात जोडले आहेत. या पाच जणांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
आंध्र प्रदेशच्या अनंतपूरमधला हा फोटो असल्याचं सांगण्यात येत आहे. हा फोटो कर्नाटर कॅडरचे आयपीएस अधिकारी अभिषेक गोयल यांनी मंगळवारी ट्विट केला आहे. हा पोलीस आणखी काय करु शकतो? आपल्याकडे नेहमी एक पर्याय उपलब्ध असतो. प्रत्येकवेळी सुरक्षीत पर्यायच निवडा, असं ट्विट अभिषेक गोयल यांनी केलं आहे. या ट्विटनंतर हा फोटो सोशल नेटवर्किंग साईटवर व्हायरला झाला. संध्याकाळपर्यंत ३ हजारपेक्षा जास्त जणांनी हा फोटो शेअर केला आहे.
हात जोडणाऱ्या पोलिसाचं नाव बी शुभ कुमार असल्याची माहिती समोर आली आहे. शुभ कुमार हे अनंतपूरचे रहिवासी आहेत. रस्ते सुरक्षा अभियानासाठी एक दीड तासाचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात बाईकवरची व्यक्ती उपस्थित होती. या पाच जणांना एकाच बाईकवर पाहून माझं डोकं काम करायचं बंद झालं, असं शुभ कुमार म्हणाले आहेत.
What else can he do ?
We always have a choice .. chose the safe one ! #BeSafe pic.twitter.com/noLHyAMqBn
— Abhishek Goyal (@goyal_abhei) October 10, 2017