Fell In Love With Miss Call: प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हटलं जातं. त्यामुळे कधी कोणासोबत, कसं प्रेम जडेल सांगता येत नाही. एका मिस कॉलमुळेही प्रेम होऊ शकतं. असाच प्रकार जहानाबादमध्ये समोर आला आहे. एका मिस कॉलमुळे मनोहरसोबत तिचं सूत जुळलं आणि प्रेमाचं रुपांतर लग्नात झालं. मनोहरने मार्चमध्ये लग्न करून दिल्लीला नेले. प्रेमाच्या जाळ्यात ओढताना त्याने स्वतः अविवाहित असल्याचे सांगितले होते. पण नंतर तिला दिल्लीहून त्यांच्या घरी घेऊन गेला. तेव्हा त्यांची पत्नी आणि मुलेही तिथे होती. त्यामुळे तिच्या पायाखालची वाळूच सरकरली. आपली फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं.
मनोहरच्या पहिल्या पत्नी आणि मुलांना पाहून दोघांमधील भांडण टोकाला गेलं. दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. पण कोर्टात पती पोहोचलाच नाही. यामुळे तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. पतीचा शोध घेत असताना मनोहर कोर्ट स्टेशनच्या बाहेर दिसला. त्यानंतर विवाहित महिलेचा संयम सुटला आणि तिने तिला जाहीरपणे पकडून बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. पत्नीच्या तावडीतून निसटल्यानंतर उपस्थित लोकांनी त्याला पकडले.
प्रेमात फसवणूक झालेल्या विवाहितेने पतीला जाहीरपणे पकडून बेदम मारहाण केल्याने जहानाबादमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.