Pigeons Killing: तू माझी मांजर चोरली, मी तुझी कबुतरं ठार केली; घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले

उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या 30 कबुतरांनी विषारी पदार्थ खाऊ घालत त्यांना ठार केलं. शेजाऱ्याने आपली मांजर चोरल्याचा संशय असल्याने त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.   

Updated: Jan 21, 2023, 09:29 AM IST
Pigeons Killing: तू माझी मांजर चोरली, मी तुझी कबुतरं ठार केली; घटनाक्रम ऐकून पोलीसही चक्रावले title=
मांजर चोरल्याच्या संशयातून 30 कबुतरांची हत्या (Photo: PIxabay)

UP Pigeons Killing: शेजारी म्हटंल की त्यांच्यासह जिव्हाळा, वाद, भांडणं अशा सगळ्या गोष्टीही येतात. शेजाऱ्यांसह होणारे वाद अनेकदा इतके टोकाला पोहोचतात की थेट पोलीस स्टेशन गाठावं लागतं. उत्तर प्रदेशातही (Uttar Pradesh) अशीच एक घटना समोर आली आहे. मात्र हा वाद इतक्या टोकापर्यंत पोहोचला की त्याने 30 पाळीव कबुतरांची हत्या (Pigeons Killing) केली. याचं कारण ऐकलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर येथे एका व्यक्तीने शेजाऱ्याच्या 30 कबुतरांनी विषारी पदार्थ खाऊ घालत त्यांना ठार केलं. शेजाऱ्याने आपली मांजर चोरल्याचा संशय असल्याने त्याने हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाची बाब म्हणजे, आरोपी अबीदची मांजर काहीवेळाने पुन्हा घरी परतली. याआधीही अनेकदा असंच झालं आहे. पण मांजर चोरल्याच्या संशयातून शेजारी वारीस अली याला मात्र आपले 78 पैकी 30 कबुतर गमवावे लागले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबीदची मांजर काही दिवसांपूर्वी अचानक गायब झाली होती. आपल्या शेजाऱ्याने मांजरीची हत्या केली असावी असा त्याला संशय आला. यानंतर त्याने अलीच्या पाळीव कबुतरांच्या खाण्यात विष मिसळलं. हे विष खाल्ल्याने 30 कबुतरांचा मृत्यू झाला. मंगळवारी ही घटना घडली. 

पोलिसांनी याप्रकरणी अबीदसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान कबुतरांना शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक (शहर) संजय कुमार यांनी सांगितलं आहे.