Viral News: सध्याच्या काळात ऑनलाइन माध्यमातून फसवणूक होण्याचे प्रकार घडत असून लोक फार सतर्क असतात. बँकाही ग्राहकांना ऑनलाइन फसवणुकीला बळी पडू नका असं आवाहन सतत करत असतात. याचं कारण म्हणजे अनेक लोकांनी या माध्यमातून लाखो रुपये गमावले आहेत. त्यामुळेच जेव्हा आपल्याला एखादा आर्थिक देवाण घेवाण करण्यासंबंधी फोन येतो तेव्हा लोक त्यावर लगचे विश्वास ठेवत नाहीत. त्यातही जेव्हा तुम्ही लॉटरी जिंकले आहात सांगत बँकेचे डिटेल्स मागवले जातात तेव्हा लोक घाबरुन फोन कट करतात. असाच एक प्रकार बंगळुरुत घडला आहे. पण याच फोनमुळे अरुण कुमार वटाके यांचं नशीब फळफळलं आहे.
कुमार यांना एक फोन आला होता, ज्यामध्ये त्यांना तुम्ही लॉटरीमधून 44.5 कोटी रुपये जिंकल्याचं सांगण्यात आलं. पण कुमार यांना आपली फसवणूक होत असल्याचं वाटलं आणि त्यांना तात्काळ फोन कट केला. इतकंच नाही तर त्यांनी तो नंबरही ब्लॉक करुन टाकला. पण या चुकीमुळे कुमार यांना करोडोंचं नुकसान झालं असतं.
लॉटरी कंपनीने त्यांना दुसऱ्या क्रमांकावरुन फोन करत संपर्क साधला आणि तुमची कोणीही फसवणूक करत नसल्याचं पटवून सांगितलं. कुमार यांनी खरोखरच करोडोंची लॉटरी जिंकली होती. जर कुमार यांनी अजून एक दोन वेळा कॉल कट केला असता तर कदाचित ही त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली असती. कुमार यांना तब्बल 44 कोटी गमवावे लागले असते.
कुमार यांनी सागितलं की "बिग तिकिटकडून फोन आला असता मला हा फेक कॉल असल्याचं वाटलं. मी फोन कट केला आणि तो नंबरही ब्लॉक केला. थोड्या वेळाने मला दुसऱ्या क्रमांकावरुन फोन आला. तेव्हा मला आपण लाइव्ह ड्रॉमध्ये 44 कोटी जिंकलो आहोत यावर विश्वास बसला". कुमार यांनी आपल्या आयुष्यात दुसऱ्यांदा लॉटरीचं तिकीट खरेदी केलं होतं.
कुमार यांनी सांगितलं की, आपण जे तिकीट विकत घेतलं होतं ते दोन तिकीटवर फ्री मिळाल होतं. त्याच तिसऱ्या तिकीटावर आपल्याला लॉटरी लागली आहे. आपण जिंकलो आहोत, यावर अजून विश्वास बसत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.