वहीच्या 50 पानांवर 'I hate my life ' लिहून ९ वीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

 छत्तीसगडमधील दूर्ग आणि भिलाईमध्ये दोन आत्महत्यांच्या घटना  समोर आल्या आहेत. दोन तरुणींनीच्या आत्महत्यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Updated: Jul 2, 2021, 05:19 PM IST
वहीच्या 50 पानांवर 'I hate my life ' लिहून ९ वीच्या विद्यार्थीनीची आत्महत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का title=

दुर्ग : छत्तीसगडमधील दूर्ग आणि भिलाईमध्ये दोन आत्महत्यांच्या घटना  समोर आल्या आहेत. दोन तरुणींनीच्या आत्महत्यांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एकीने आत्महत्या करण्यापूर्वी स्मार्टफोन फॉरमॅट केला तर दुसरीने आपल्या वहीच्या ५० पानांवर I hate you असं लिहलंय. तरुणींनी उचललेल्या या पावलांमुळे सर्वजन स्तब्ध झाले आहेत.

50 पानांवर लिहलं की आयुष्याचा तिरस्कार वाटतो.

पहिली आत्महत्येची घटना भिलाईमध्ये खुर्सिपार पोलीस स्टेशन अंतर्गत पाहायला मिळाली. 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी एम चांदनीने फाशी लावून आत्महत्या केली. कुटूंबियांना माहितच नाही की नेमकं तिने आत्महत्या का केली.

घटनेच्यावेळी आई वडील घरी नव्हते. कुटूंबिय आल्यानंतर त्यांनी पंख्याला लटकलेला मृतदेह खाली उतरवला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. घटनास्थळी एक वही मिळाली त्याच्या ५० पानांवर या मुलीने I hate my life असं लिहलं होतं. परंतु तिने एक मुलगा आणि एकम मुलगी सोबत बसल्याचे चित्र देखील रेखाटले आहे. काही पानांवर तिने एक मुलगी एकटीच बसल्याचेही चित्र रेखाटले आहे. 

पोलीसांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मुलीने प्रेमसंबधांतून आत्महत्या केली असावी, असा अंदाज आहे.

सुश्मिता नावाच्या मुलीने संगित तसेच फॅशन डिझाइनिंगचा अभ्यास केला होता. आत्महत्येआधी या मुलीने आपला फोन फॉरमॅट केला होता. पोलिसांना प्राथमिक तपासात या मुलीच्या आत्महत्येच्या कारणाचा अद्याप अंदाज आलेला नाही.