तिरूवअनंतपुरम : कर्थयायीनी अम्मा या ९६ वर्षांच्या आहेत, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच लेखी परीक्षा दिली. यात अम्मांनी अव्वल गुण मिळवले आहेत. केरळमधील अलपुझा नावातील लहान शहरात त्या राहतात. त्यानी साक्षारता मिशन अंतर्गत परीक्षा दिली. ही परीक्षा देताना अम्मा या वयातही शांतपणे परीक्षा देत होत्या, त्यांचा आत्मविश्वास देखील तेवढाच दांडगा होता.
मल्याळम लिखाणाच्या परीक्षेत त्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले, यात लेखन, वाचन आणि बीजगणिताचा समावेश होता. केरळ साक्षरता मिशन अंतर्गत या परीक्षा घेण्यात आल्या, त्यासाठी अम्मांची ६ महिन्यापासून तयारी सुरू होती.
चौथीच्या अभ्यासक्रमाच्या समकक्ष ही परीक्षा होती. अम्मांच्या वयाचा विचार करून, एवढा वेळ बसून त्यांनी परीक्षा दिल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. शिकण्याचं कोणतंही वय नसतं हे अम्मांनी सिद्ध केलं आहे.