रामाची निस्सीम भक्त, आयोध्या निकालानंतर सोडला उपवास

८१ वर्षीय उर्मिला यांनी तब्बल २७ वर्ष उपवास केला.

Updated: Nov 13, 2019, 08:58 PM IST
रामाची निस्सीम भक्त, आयोध्या निकालानंतर सोडला उपवास  title=

जबलपूर : प्रभू रामाच्या निस्सीम भक्त असणाऱ्या ऊर्मिला चतुर्वेदी यांनी आयोध्या निकालानंतर त्यांचा उपवास सोडला आहे. ८१ वर्षीय उर्मिला यांनी तब्बल २७ वर्ष उपवास केला. अखेर त्यांना प्रभू रामावरच्या भक्तीचे फळ मिळाले आहे. २७ वर्षे त्यांनी फक्त दुध आणि फळं घेतले. शनिवारी निकाल लागल्यानंतर त्यांनी आहार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या संस्कृत शिक्षीका आहेत. 

ऊर्मिला चतुर्वेदी गेल्या २७ वर्षांपासून उपवास करीत असून, आता त्या नियमित आहार घेतील, असे चतुर्वेदी यांच्या मुलाने स्पष्ट केले. 'माझी आई प्रभू रामाची निस्सीम भक्त आहे. त्यामुळे निकालानंतर ती समाधान व्यक्त करत आहे.' असं वक्तव्य त्यांच्या मुलाने केलं आहे. 

त्याचप्रमाणे चतुर्वेदी कुटुंबीय उद्यापन सोहळा आयोजित करणार असल्याचेही अमित यांनी स्पष्ट केले. अयोध्या विवादात्मक जागेवर अखेर सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूना देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्याचवेळी मुस्लिमांना पर्यायी जागा देण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला आहे.