मुंबई : रूग्णसेवा हीच ईश्वरसेवा असं मानून वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी आपलं कार्य करत असतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात लॉकडाऊन असताना फक्त अत्यावश्यक सेवा कार्यरत आहेत. ११ दिवस आपला देश लॉकडाऊनमध्ये आहे. संपूर्ण देश घरात असताना फक्त अत्यावश्यक सेवा कार्यरत आहेत. त्यांचे खरंच मनापासून आभार मानायला हवेत. अशा परिस्थितीत वैद्यकीय विभागातील डॉक्टर आणि नर्स आपल्या जीवाची बाजी लावत रूग्णांची सेवा करत आहेत.
कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार करण्यासाठी ८ महिन्याच्या गरोदर नर्सने तब्बल २५० किमीचा प्रवास केल्याची प्रेरणादायी घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. एस विनोदिनी असं या परिचारिकेचं नाव तिथे तामिळनाडूच्या तिरूची ते रामानाथापुरम इथपर्यंत प्रवास केला आहे. विनोदिनी सध्या कोरोनाग्रस्त रूग्णांच्या सेवेसाठी कार्यरत आहे.
खासगी रूग्णालयात काम करणाऱ्या विनोदिनीला १ एप्रिल रोजी रामानाथापुरमच्या स्वास्थ सेवा संयुक्त निर्देशक यांचा फोन आला. तेव्हापासून ती प्राथमिक आरोग्य केंद्रावर रूग्णांची सेवा करत आहे. तेव्हा ती तब्बल २५० किमीचा प्रवास करून रूग्णालयात पोहोचली.
खरंच असं कार्यकरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सलाम... आज आपण पाहत आहोत प्रत्येकाला घरात राहण्याचं आवाहन देत अत्यावश्यक सेवेतील मंडळी मात्र देशाच्या सेवेसाठी घराबाहेर आहेत. या व्यक्तीचं जितकं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. त्यांचे कितीही आभार मानले तरी ते तोकडेच ठरणार आहेत.
अनेक नर्सेस सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांसाठी संवाद साधत आहेत. आम्ही तुमच्या सेवेत तत्पर आहोत. पण तुम्ही घराबाहेर पडून आमच्यापर्यंत येऊच नका. असा संदेश त्या देत आहेत. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत.