सातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचा-यांना सरकार देणार मोठी आनंदाची बातमी

२०१८ हे वर्ष केंद्रीय कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येण्याची शक्यता आहे. भाजप सरकार न्यूनिअर लेव्हलच्या कर्मचा-यांच्या पगार मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. 

Updated: Feb 13, 2018, 03:34 PM IST
सातवा वेतन आयोग : केंद्रीय कर्मचा-यांना सरकार देणार मोठी आनंदाची बातमी title=

नवी दिल्ली : २०१८ हे वर्ष केंद्रीय कर्मचा-यांसाठी आनंदाची बातमी घेऊन येण्याची शक्यता आहे. भाजप सरकार न्यूनिअर लेव्हलच्या कर्मचा-यांच्या पगार मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. 

काय असेल बातमी?

मीडिया रिपोर्टनुसार, नॅशनल अनोमली कमिटीने डीओटीपीला केंद्रीय कर्मचा-यांचा कमीत कमी पगार १८ हजारांहून २१ हजार करण्याची शिफारीश केली होती. तर फिटमेंट फॅक्टर २.५७ हून ३.०० करण्याची सिफारीश केली होती. यासंदर्भातील घोषणा सरकारकडून एप्रिल महिन्यात केली जाऊ शकते. 

काय होती मागणी?

सातव्या वेतन आयोगाने केंद्रीय कर्मचा-यांचा पगारात १४.२७ टक्के बेसिक पे वाढवण्याची सिफारीश केली होती. तर फिटमेंट फॅक्टर २.५७ टक्के वाढवण्याची सिफारीश केली होती. सातव्या वेतन आयोगाचा लाभ मिळाल्यानंतर कमीत कमीत पगार ७ हजार रूपयांवरून १८ हजार रूपये महिना होणार आहे. त जास्तीत जास्त पगार ८० हजार रूपये महिन्यांवरून वाढून २.५ लाख रूपये होणार आहे. याला कॅबिनेटने जून २०१६ मध्ये याला मंजूरी दिली होती. केंद्रीय कर्मचा-यांची मागणी कमीत कमी १८ हजार रूपये महिना वाढवून २६ हजार रूपये महिन्याची केली आहे. तर फिटमेंट फॅक्टर हा २.५७ टक्क्यांहून वाढवून ३.६८ टक्के केला जावा.