गुड न्युज! Family Pension ची वाढली लिमिट; आता सरकार देणार दर महिना 1.25 लाख रुपये, नियम जारी

देशातील जे नागरीक फॅमिली पेंशनचा फायदा घेत आहेत त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेंशनची लिमिट 45 हजार रुपयांपर्यंत होती. ती आता सरकारने अडीच पट वाढवली आहे.

Updated: Aug 19, 2021, 10:38 AM IST
गुड न्युज! Family Pension ची वाढली लिमिट; आता सरकार देणार दर महिना 1.25 लाख रुपये, नियम जारी title=

नवी दिल्ली : देशातील जे नागरीक फॅमिली पेंशनचा फायदा घेत आहेत त्यांच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेंशनची लिमिट 45 हजार रुपयांपर्यंत होती. ती आता सरकारने अडीच पट वाढवली आहे. म्हणजे च आता तुम्हाला दर महिना 1.25 लाख रुपये मिळतील. सरकारचे म्हणणे आहे की, या निर्णयामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांचे जगणे सोईस्कर होईल.

अडीच पटीने वाढ
आधी फॅमिली पेंशनधारकांना दर महिना 45 हजार रुपये दिले जात होते. परंतु यापुढे त्यांना 1.25 लाख रुपये दरमहा मिळतील. सरकारच्या वतीने सांगण्यात आले की, केंद्रीय सिविल सेवा (पेंशन)नियम 1972 चे नियम 54 च्या उपनियम (11)नुसार जर पती आणि पत्नी दोन्ही सरकारी कर्मचारी असतील तर या नियमांच्या अंतर्गत येतात. तर दोन्ही कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुंटूबियांना दोन फॅमिली पेंशन मिळू शकतात.

7 व्या वेतन आयोगानुसार सरकारी नोकरीमध्ये वेतन सुधार करून 2.5 रुपये प्रति महिना करण्यात आले आहेत. अशातच सेंट्रल सिविल सर्विसेस नियम 1972 च्या कलम 54 च्या उपकलम (11)अंतर्गत रक्कम सुधारित करण्यात आली आहे. त्यानुसार 2.5 लाखांच्या निम्मे म्हणजेच 1.25 लाख रुपयांची पेंशन यापुढे सरकारी अधिकाऱ्याच्या मृत्यूनंतर कुटूंबियांना मिळणार आहे.