7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता (DA पेमेंट) मूळ वेतनावर दिला जातो

Updated: Feb 11, 2022, 08:04 PM IST
7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ title=

मुंबई : केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. जानेवारी 2022 साठी महागाई भत्त्यात 3% वाढ निश्चित करण्यात आली आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34% दराने महागाई भत्ता (डीए वाढ) मिळेल. मार्चमध्ये होळीनंतर त्याची घोषणा होऊ शकते. म्हणजे 31 मार्च 2022 रोजी येणाऱ्या पगारात ते दिले जाऊ शकते.

औद्योगिक कामगारांसाठीचा महागाई भत्ता ग्राहक किंमत निर्देशांक (AICPI) निर्देशांकाच्या आधारे 34.04% केला जातो. परंतु, महागाई भत्ता फक्त राउंड फिगरमध्ये दिला जातो. अशा परिस्थितीत जानेवारी 2022 पासून कर्मचाऱ्यांना एकूण 34% महागाई भत्ता मिळणार आहे. याशिवाय दोन महिन्यांचा म्हणजे जानेवारी, फेब्रुवारीचा डीए मार्चमध्येही थकबाकी म्हणून मिळेल.

मार्चमध्ये पैसे दिले जातील!

7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, महागाई भत्ता (DA पेमेंट) मूळ वेतनावर दिला जातो. लवकरच त्याची घोषणा केली जाईल. मार्चमध्ये होळीनंतर त्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, निवडणूक आचारसंहितेमुळे सरकार तूर्तास त्याची घोषणा करणार नाही.

सरकारच्या या निर्णयामुळे 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि 65 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.

सध्या कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. जानेवारी 2022 पासून 3% अधिक महागाई भत्त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. ज्यामुळे एकूण महागाई भत्ता 34% असेल. आता पुढील महागाई भत्ता जुलै 2022 मध्ये मोजला जाईल.

34% DA वर गणना

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% ने वाढ केल्यानंतर एकूण DA 34% होईल. आता 18 हजार रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता 73 हजार 440 रुपये असेल. परंतु, सध्याच्या महागाई भत्त्यातील फरकाबद्दल जर आपण विचार केला तर, पगारातील वार्षिक वाढ 6 हजार 480 रुपये होईल. ज्यामुळे त्यांना दरमहा 6 हजार 120 रुपये महागाई भत्ता मिळेल.

त्याच वेळी, जर आपण कमाल वेतन श्रेणीचा विचार केला तर 56 हजार 900 रुपयांच्या मूळ पगारावर एकूण वार्षिक महागाई भत्ता 2 लाख 32 हजार 152 रुपये होईल. त्याला सध्याच्या डीएपेक्षा 1 हजार 707 रुपये अधिक मिळतील. म्हणजेच, 19 हजार 346 रुपये दरमहा डीए मिळेल.

कमीत कमी बेसिक पगाराव कॅलक्युलेशन

 

1. कर्मचारी ची बेसिक सॅलरी  18,000 रुपये 
2. नवीन महागाई भत्ता (34%)       6120 रुपये/महिना
3. आत्तापर्यंतचा महागाई भत्ता (31%)   5580 रुपये/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला  6120- 5580 = 540 रुपये/महिना
5. वार्षिक सॅलरीतील मिळकत     540X12= 6,480 रुपये

जास्तीत जास्त बेसिक पगाराव कॅलक्युलेशन

1. कर्मचारी ची बेसिक सॅलरी 56900 रुपये
2. नवीन महागाई भत्ता (34%)       19346 रुपये/महिना
3. आत्तापर्यंतचा महागाई भत्ता (31%)   17639 रुपये/महिना
4. किती महागाई भत्ता वाढला  19346-17639= 1,707 रुपये/महिना
5. वार्षिक सॅलरीतील मिळकत     1,707 X12= 20,484 रुपये