'आधार'शिवाय या सात महत्त्वाच्या सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत!

'आधार क्रमांक' इतका महत्त्वाचा होऊ शकेल याचा काही वर्षांपूर्वी कुणी विचारही केला नसेल... पण, सध्या मात्र या आधार क्रमांकाला भलतंच महत्त्व प्राप्त झालंय. मुलांच्या शाळेतील प्रवेशापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सर्व ठिकाणी आधार क्रमांक महत्त्वाचा ठरतोय.

Updated: Aug 12, 2017, 05:04 PM IST
'आधार'शिवाय या सात महत्त्वाच्या सुविधा तुम्हाला मिळणार नाहीत! title=

मुंबई : 'आधार क्रमांक' इतका महत्त्वाचा होऊ शकेल याचा काही वर्षांपूर्वी कुणी विचारही केला नसेल... पण, सध्या मात्र या आधार क्रमांकाला भलतंच महत्त्व प्राप्त झालंय. मुलांच्या शाळेतील प्रवेशापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सर्व ठिकाणी आधार क्रमांक महत्त्वाचा ठरतोय.

काही सरकार कामांसाठी तर आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आलाय. तर आधार शिवाय तुम्हाला पुढील सात सुविधा मिळू शकणार नाहीत...

१. बँक अकाऊंट सुरू करणं

जर तुम्हाला एखाद्या बँकेत तुमचं अकाऊंट सुरू करायचंय तर अगोदर आधार क्रमांक बँकेला द्यावा लागेल. सोबतच आपलं बँक अकाऊंट आधार क्रमांकाला जोडणं अनिवार्य करण्यात आलंय. ५० हजार रुपयांपासून अधिक रकमेचं ट्रान्झक्शन करायचं असेल तर आधार आणि पॅन क्रमांक गरजेचा आहे.

२. इन्कम टॅक्स रिटर्न

इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करण्यासाठी पॅनसोबतच आधार क्रमांकही गरजेचा आहे.

३. पॅन क्रमांक

तुम्हाला पॅन क्रमांकासाठी अर्ज करायचा असेल तर तुमच्याकडे अगोदर आधार क्रमांक असणं गरजेचं आहे. शिवाय तुमच्याकडे अगोदरपासून पॅन क्रमांक असेल तर तो आधार क्रमांकाशी जोडणं गरजेचं आहे.

४. प्रोव्हिडेंट फंड

एम्प्लॉई प्रोव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन (EPFO) नं आधार कार्डला प्रोव्हिडंट फंडशी जोडणं अनिवार्य केलंय. 

५. मोबाईल सिम कार्ड

आता तर आपल्या हातातील मोबाईल क्रमांकही आधार कार्डला लिंक करणं अनिवार्य करण्यात आलंय. अन्यथा तुमचा मोबाईल क्रमांक बंद होऊ शकतो. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राय) च्या नव्या नियमांनुसार, सिम कार्डसाठी आधार क्रमांक अनिवार्य आहे.

६. पासपोर्ट

परदेश मंत्रालयानं पासपोर्ट बनवण्यासाठी तसंच पासपोर्ट रिन्यू करण्यासाठी आधार क्रमांक गरजेचा केलाय.

७. सार्वजनिक वितरणाचा लाभ

सार्वजनिक वितरणाचे फायदे (PDS)मिळवण्यासाठीही तुम्हाला आधार क्रमांक सादर करणं गरजेचं आहे. PDS सबसिडीचा लाभ घेण्यासाठी राशन कार्डला आधार कार्डशी लिंक करून घ्या.