मुंबई : फेसबुकच्या मालकीची कंपनी असलेल्या व्हॉट्सऍपने (WhatsApp) आता आणखी एक नवीन फीचर बाजारात आणले आहे. आपल्या यूजर्ससाठी, यूजर फ्रेंडली प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्यासाठी व्हॉट्सऍपने, मॅसेंजर रुम (Messenger Rooms) नावाची एक नवीन सुविधा सुरु केली आहे. ज्यामध्ये 50 यूजर्स एकत्र ग्रूप व्हिडिओ कॉल(Group Video Call) करु शकतात.
मॅसेजिंग प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार एक यूजर Rooms बनवू शकतो. येथे तो मोबाईलचा वापर करुन किंवा वेब ब्राऊजचा वापर करुन मॅसेजर वेबसाईट खोलून व्हिडिओ चॅट करु शकतात. यूजर हा कॅाल करण्यासाठी आपले कॅान्टॅक्स आणि ग्रूप चॅटसाठी इनविटेशन लिंक पाठवू शकतो आणि त्या लिंकवर क्लिक करुन समोरील व्यक्ती त्या Rooms मध्ये ऍड होऊ शकतो.
या फीचरची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की, यूजर फक्त लिंकमार्फत ग्रूप व्हिडिओ कॉलमध्ये ऍड होई शकतो, मग भलेही त्याच्याकडे फेसबूक अकाउंट किंवा मॅसेंजर ऍप नसला तरी चालेल.
व्हॉट्सऍप वेब किंवा डेस्कटॉपवर उघडा.
त्या चॅटवर जा. जिथे तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा आहे.
स्क्रीनवरील अटॅचमेन्ट आयकॅान क्लिक करा.
'Rooms' वर क्लिक करा.
’Continue in Messenger’ पर्यायावर क्लिक करा.
व्हॉट्सऍप अॅप्लिकेशन तुम्हाला एक लिंक पाठवेल जो तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्सला पाठवू शकता. जेणेकरून ते त्या लिंकवर क्लिक करून त्याच Roomsमध्ये सामील होऊ शकतात. 'मेसेंजर रूम' सुविधा केवळ त्या ग्रृप्ससाठी कार्य करेल ज्यांचे पाचपेक्षा जास्त मेंबर आहेत.
कोरोनामुळे लोकं काम असो वा शाळा किंवा महाविद्यालयातील online क्लासेस, सगळ्यासाठी Google meet, zoom या पर्यायांकडे वळले. व्हॉट्सऍपवर या आधी Video call करता यायचा, परंतु त्यात जास्त मेंबर ऍड करण्याची सुविध नव्हती. त्यातच व्हॉट्सऍप Privacy च्या प्रश्नांमुळे लोक वेगवेगळ्या प्लॅटफॅम्सकडे वळले, त्यामुळे आपल्या यूजर्सना परत बाजारात आणण्यासाठी व्हॉट्सऍपने ही सुविधा बाजारात आणली असावी.