खेळताना बाल्कनीतून पडून ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

गाजियाबाद येथील राजनगर एक्सटेंशनच्या केडब्ल्यू सृष्टी सोसायटीत बुधवारी २१ मार्चला धक्कादायक घटना घडली. 

Updated: Mar 22, 2018, 12:22 PM IST
खेळताना बाल्कनीतून पडून ५ वर्षांच्या मुलाचा मृत्यू title=

गाजियाबाद : गाजियाबाद येथील राजनगर एक्सटेंशनच्या केडब्ल्यू सृष्टी सोसायटीत बुधवारी २१ मार्चला धक्कादायक घटना घडली. सोसायटीच्या पाचव्या मजल्यावर खेळत असताना खाली पडून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा कुटुंबातील सर्व सदस्य घरातच होते. मात्र त्यांना घटनेचा मागमूसही लागला नाही. घटना घडल्यानंतर ५ मिनिटांनी सोसायटीतील सदस्यांनी त्यांच्या परिवाराला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर या कुटुंबाला जाग आली. 

गॅलरीत खेळत होता हा चिमुकला

रविंद्र आपल्या कुटंबासमेवत सृष्टी सोसायटीतील ई-ब्लॉकमध्ये पाचव्या मजल्यावर राहत होता. त्याचा पाच वर्षांचा मुलगा रुद्रांश किचनच्या बॉल्कनीमध्ये खेळत होता. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुद्रांश बॉल्कनीतील सायकलवर चढून खाली वाकून पाहात होता. त्याचदरम्यान तो दुसऱ्या मजल्यावरील छतावर पडला. डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

कुटुंबातील सदस्य घरातच

कुटुंबातील सदस्य घरातच होते तरी त्यांना या घटनेची खबर लागली नाही. मुलगा खाली पडल्याने झालेल्या आवाजामुळे दुसऱ्या मजल्यावरील लोक तेथे जमले. त्यांनी घटनेची माहिती मुलाच्या कुंटुंबियांनी दिली. त्यानंतर तातडीने त्याला पहिल्यांदा यशोदा आणि नंतर कोलंबिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोस्टमॉर्टमला विरोध

घटनेची खबर मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी तपासणी केली. पोलिसांनी मृत मुलाचे पोस्टमॉर्टम करण्यास सांगितले पण कुटुंबियांनी त्याला विरोध केला.
सोसायटीतील रहिवासांशी सांगितले की, सोसायटीमधील प्रत्येक फ्लॅटची बाल्कनीची ग्रिल लहान आहे. त्यामुळे मुलं पडण्याची शक्यता अधिक आहे. तरी देखील कुटुंबातील सदस्यांनी बाल्कनीचा दरवाजा उघडा ठेवला. ते पाहुन रुद्रांश तिथे गेला आणि हा गंभीर प्रकार घडला.