रेल्वे रूळ ओलांडताना अपघात, ट्रेनच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू, दोन जखमी

दिल्लीजवळ असलेल्या हापुड येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Feb 26, 2018, 08:06 AM IST
रेल्वे रूळ ओलांडताना अपघात, ट्रेनच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू, दोन जखमी title=
Representative Image

नवी दिल्ली : दिल्लीजवळ असलेल्या हापुड येथे एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हापुडमधील गांधी रेल्वे फाटकाजवळ हा अपघात झालाय. रविवारी रात्री ८.४५ मिनिटांच्या सुमारास काही तरुण रेल्वे ट्रॅकच्या शेजारुन चालत जात होते. त्याच दरम्यान, दिल्ली मुरादाबाद या ट्रेनची धडक या तरुणांना लागली. 

या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व तरुण गाझियाबादहून हैदराबाद येथे जात होते.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि रेल्वे अधिकारी दाखल झाले. जखमी तरुणांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.