लॉकडाऊन दरम्यान राम मंदिरासाठी 4 कोटी 60 लाखांचं दान जमा

राम मंदिरासाठी लॉकडाऊन दरम्यान ही दान सुरुच

Updated: May 25, 2020, 06:54 PM IST
लॉकडाऊन दरम्यान राम मंदिरासाठी 4 कोटी 60 लाखांचं दान जमा title=

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. त्यामुळे राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर सील करण्यात आल्या आहेत. सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे अद्याप बंद आहेत. परंतु या लॉकडाऊन दरम्यानही राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या ट्रस्टसाठी मोठी देणगी जमा झाली आहे. राम मंदिर बांधकामासाठी लॉकडाऊन दरम्यान 4 कोटी 60 लाखांची देणगी जमा झाली आहे.

विविध देणगीदारांनी ही रक्कम राम मंदिर बांधण्यासाठी, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात जमा केली आहे. यासंदर्भात राम मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले की, पैशाअभावी राम मंदिर बांधण्यात कोणताही अडथळा येऊ नये आणि भव्य, दिव्य असं राम मंदिर बांधणे ही भाविकांची इच्छा आहे. म्हणूनच भक्त सतत दान देत आहेत.

भगवान राम यांना 27 वर्षांपासून बंद राहावे लागले. आजही ते तात्पुरत्या लाकडी मंदिरात आहे. सत्येंद्र दास म्हणाले की, आता बरीच व्यवस्था केली गेली आहे, पण रामललासाठी भव्य आणि दिव्य मंदिर बांधले जावे, ही संतांची मागणी आहे. भव्य मंदिर बांधले जावे, असे सरकारनेही म्हटले आहे.

राम मंदिराचे पुजारी म्हणाले की, ट्रस्ट खात्यातील देणगीची रक्कम सातत्याने वाढत आहे. विशेष म्हणजे राम मंदिरासंदर्भात दिलेल्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सरकारला मंदिराच्या बांधकामासाठी विश्वस्त स्थापन करण्यास सांगितले होते. कोर्टाच्या निर्देशानुसार सरकारने श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टची स्थापना केली. हा ट्रस्ट मंदिर बांधकामाची जबाबदारी सांभाळणार आहे.