देशात कोरोना व्हायरसचा आणखी एक बळी

कोरोनामुळे देशात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू

Updated: Mar 22, 2020, 12:07 PM IST
देशात कोरोना व्हायरसचा आणखी एक बळी  title=
संग्रहित फोटो

पटना : कोरोनाचा फैलाव देशभरात वाढतच आहे. दिवसेंदिवस देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ असून मृतांचा आकडाही वाढत असल्याचं चित्र आहे. बिहारमध्ये कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. 38 वर्षीय व्यक्तीचा पटनामधील  AIIMS रुग्णालयात मृत्यू झालाय. 

सैफ अली असं 38 वर्षीय मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव असून तो बिहारमधील मुंगेर येथे राहणार होता. काही दिवसांपूर्वीच तो कतारहून परतल्याची माहिती AIIMS रुग्णालयाच्या संचालकांनी दिली आहे.

शनिवारी किडनी फेल झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. मात्र हा रुग्ण कोरोना व्हायरस संशयित होता. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.