कोरोना: गेल्या २४ तासात देशात ३३१ रुग्णांचा मृत्यू तर ९९८७ रुग्ण वाढले

देशात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

Updated: Jun 9, 2020, 11:19 AM IST
कोरोना: गेल्या २४ तासात देशात ३३१ रुग्णांचा मृत्यू तर ९९८७ रुग्ण वाढले title=

मुंबई : कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 9987 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 331 लोकांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, देशात एकूण रूग्णांची संख्या २ लाख 66 हजार 598 वर पोहोचली आहे.

गेल्या 24 तासांत सुमारे 5 हजार लोक बरे झाले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 1 लाख 29 हजार 214 झाली आहे. सध्या देशात 1 लाख 29 हजार 917 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 1 लाख 41 हजार 682 लोकांची चाचणी घेण्यात आली आहे. आतापर्यंत 49 लाख 16 हजार 116 लोकांची कोरोना टेस्ट करण्यात आली आहे.

कोरोनाचा सर्वाधिक कहर हा महाराष्ट्रात पाहायला मिळतो आहे. येथे एकूण रुग्णांची संख्या 88 हजारांच्या पुढे गेली आहे तर 3169 लोकांचा मृत्यू देखील झाला आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत 2553 नवीन रुग्णांची वाढ झाली असून 109 लोकांचा मृत्यू झाला. तर 40 हजार 975 लोकं आतापर्यंत बरे झाले आहेत. राज्यात आता 44 हजार 374 रुग्ण उपचार घेत आहेत.

दिल्लीमध्ये सोमवारी एक हजाराहून अधिक नवीन रुग्ण वाढले तर 17 लोकांचा मृत्यू झाला. दिल्ली सरकारने जाहीर केलेल्या हेल्थ बुलेटिनमधील डेथ ऑडिट कमिटीच्या अहवालाच्या आधारे, 30 मे ते 6 जून या कालावधीत 62 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची उशिरा नोंद झाली आहे. एकूण रूग्णांची संख्या ३० हजारांच्या जवळपास असून 874 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तामिळनाडूमध्ये रुग्णांची संख्या 33 हजार 229 वर गेली असून 286 लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील रूग्णांची एकूण संख्या 20 हजारांच्या पुढे गेली आहे. आतापर्यंत 1249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत येथे 480 रुग्णांची वाढ झाली असून 30 लोकांचा मृत्यू झाला आहे.