देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 1397 वर; 35 जणांचा मृत्यू

आतापर्यंत 124 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

Updated: Mar 31, 2020, 10:27 PM IST
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 1397 वर; 35 जणांचा मृत्यू title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसने भारतासह जगभरात थैमान घातलंय. देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होतेय. कोरोना रुग्णांमध्ये सतत होणारी वाढ मोठं चिंतेचं कारण ठरतंय. मंगळवारी सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढून तो 1397 वर पोहचला आहे. आतापर्यंत 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 124 लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. 

चंडीगडमध्ये पोस्टग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मडिकल एज्युकेशन ऍन्ड रिसर्चमध्ये उपचारावेळी एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. त्या 65 वर्षांच्या होत्या.

राजस्थानमध्ये आतापर्यंत 93 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. त्यापैकी 17 भारतीय ईराणहून परतले होते.

तेलंगानामध्ये मंत्री के.टी. आर यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 70 लोक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यापैकी 12 जण पूर्णपणे बरे झाले आहे. या 12 जणांची कोरोना टेस्ट आता निगेटिव्ह आली आहे.

कर्नाटकमध्ये आतापर्यंत 98 कोरोना व्हायरसची प्रकरणं समोर आली आहेत. त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झालाय. तर 6 लोक बरे झाले आहेत.

महाराष्ट्रात आतापर्यंत 302 रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

इंदौरमध्ये आतपर्यंत 44 लोक कोरोबाधित आहेत. रविवारी शहरात 40 रुग्णांचे सॅम्पल भोपाळमध्ये पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 17 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 

यूपीमध्ये आतपर्यंत 90 कोरोनाग्रस्त आढळले. त्यापैकी नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये सर्वाधिक 38 रुग्ण आहेत. 

जगभरात आतापर्यंत 7 लाख 83 हजारांहून अधिक कोरोनाग्रस्त आहेत. त्यापैकी 38 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इटली आणि अमेरिकेत 1 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.