आसाम रायफल्सने मणिपूर हल्ल्याचा घेतला बदला, चकमकीत 3 NSCN-K(YA)चे दहशतवादी ठार

अरुणाचल प्रदेशमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार झालेले तीन दहशतवादी NSCN-K(YA) असल्याची माहिती समोर आली आहे

Updated: Nov 16, 2021, 12:11 PM IST
आसाम रायफल्सने मणिपूर हल्ल्याचा घेतला बदला, चकमकीत 3 NSCN-K(YA)चे दहशतवादी ठार title=

 

नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ठार झालेले तिघे दहशतवादी NSCN-K(YA) चे असल्याची माहिती समोर आली आहे. भारत-म्यानमार सीमेवर अजूनही कारवाई सुरू आहे, घटनास्थळावरून चीनमध्ये बनवलेली शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

ही कारवाई दक्षिण अरुणाचलच्या भारत-म्यानमार सीमेजवळील तिरप जिल्ह्यातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, NSCN-K(YA) या प्रतिबंधित संघटनेचे तीन दहशतवादी दोन नागरिकांचे अपहरण करून त्यांना म्यानमारला घेऊन जात होते. आसाम रायफल्सच्या जवानांनी तिरप जिल्ह्यातील लहूजवळ दहशतवाद्यांना ठार केले. मात्र, अपहरण झालेल्या नागरिकांची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.

मणिपूर हल्ल्यात कर्नल शहीद 

मणिपूरमधील चुराचंदपूर येथे शनिवारी झालेल्या हल्ल्यात भारतीय लष्कराचे कर्नल, त्यांची पत्नी आणि 8 वर्षांचा मुलगा आणि आसाम रायफल्सचे चार जवान शहीद झाले होते. कर्नल बिप्लब त्रिपाठी हे ४६व्या आसाम रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते.

 

Arunachal Pradesh, Militants, NSCN KYA, Indo Myanmar Border, Manipur Attack,