नवी दिल्ली : टूजी घोटाळ्याप्रकरणी दिल्लीच्या पटियाळा कोर्टाने ए राजा आणि कनिमोळीसह १९ जणांची मुक्तता केली आहे. दरम्यान, या निकालाचे काँग्रेसकडून स्वागत करण्यात आले असून हा काँग्रेसचा नैतिक विजय आहे, असा दावा काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलाय. भाजपने याप्रकरणी माफी मागावी अशी मागणी केलेय.
दिल्लीच्या पटियाळा हाऊस कोर्टातील विशेष न्यायालयात आज १ लाख ७६ हजार कोटींच्या २ जी घोटाळ्याप्रकरणी सर्व १९ जणांची निर्दोष सुटका केली आहे.
गेल्या सहा वर्षांपासून याप्रकरणीची सुनावणी सुरु होती. आज न्यायाधीश सैनी खटल्याचा निकाल दिलाय. टू जी घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन दूरसंचार मंत्री ए राजा आणि द्रमुक खासदार कनिमोळी यांच्यासह एकूण १९ जणांना अटक करण्यात आली होती.
I would love to thank everyone who stood by me: Kanimozhi, Rajya Sabha MP #2GScamVerdict pic.twitter.com/3plOl0RlLE
— ANI (@ANI) December 21, 2017
या सर्वांना आज कोर्टात हजर करण्यात आले होते. २०११मध्ये कोर्टाने याप्रकरणी जणांवर आरोपपत्र दाखल करून घेतलं. ए राजा आणि कनिमोळी यांच्यासह इतरांवर आरोप सिद्ध झाले तर किमान सहा महिने ते कमाल जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद होती. मात्र, ठोस पुरावा नसल्याने न्यायालयाने सर्वांना निर्दोष ठरवलेय.
#FLASH Verdict on 2G Scam cases pronounced, all aquitted pic.twitter.com/wmCP4WbdIw
— ANI (@ANI) December 21, 2017