अजूनही २ राज्यातील २९ जिल्ह्यात कोरोनाचा कहर..महाराष्ट्रदेखील आहे का यात?

 ब्रिटनच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला हवे, कारण इथे कमी झालेली प्रकरणे पुन्हा एकदा वाढू लागली आहेत.

Updated: Jul 10, 2021, 05:21 PM IST
अजूनही २ राज्यातील २९ जिल्ह्यात कोरोनाचा कहर..महाराष्ट्रदेखील आहे का यात? title=

मुंबई : जरी देशातील कोरोनाच्या नवीन केसेसचा वेग दररोज 50 हजारांपेक्षा कमी आहे, परंतु तरीही कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट अजूनही देशातील काही भागात कमी झालेली नाही. एकट्या महाराष्ट्र आणि केरळमध्ये देशातील निम्म्याहून अधिक प्रकरणे आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी सांगितले. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, केरळमधील 14 आणि महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यांमध्ये अद्याप कोरोना चिंतेचा विषय आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही. अशा परिस्थितीत, आपण निष्काळजी राहून कोरोना प्रोटोकॉलचे उल्लंघन करु नये.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत अग्रवाल म्हणाले की, देशभरात नवीन प्रकरणांमध्ये घट होत आहे. गेल्या आठवड्यात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये 8 टक्क्यांनी घट झाली आहे. ते म्हणाले की, देशातील  90 जिल्ह्यांमधून 80 टक्के नवीन प्रकरणे समोर येत आहेत.

कोरोना प्रोटोकॉलचे अनुसरण करण्यावर भर देताना ते म्हणाले की रशिया, बांगलादेश आणि ब्रिटनच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायला हवे, कारण इथे कमी झालेली प्रकरणे पुन्हा एकदा वाढू लागली आहेत.

अग्रवाल म्हणाले की, नुकतीच ब्रिटनमध्ये युरो चषक 2021 चे आयोजन करण्यात आले होते आणि लोक फुटबॉल सामन्यांचा आनंद घेत होते. पण आता तेथे पुन्हा एकदा कोरोना प्रकरणांना वेग आला आहे.

आरोग्य मंत्रालयाने ही सूचना अशा वेळी दिली आहे. जेव्हा अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, लवकरच तिसरी लाट भारतात येऊ शकते. दरम्यान, देशातील सर्व हिलस्टेशन्स ते बाजारपेठेपर्यंत गर्दी जमवण्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. तथापि, सध्या कोरोनाच्या नवीन प्रकरणांची संख्या सतत 50 हजारांपेक्षा कमी राहिली आहे.

शुक्रवारी एकाच दिवसात कोरोनाची संख्या 43 हजार 393 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये केरळ सध्या आघाडीवर आहे. एकाच दिवसात केरळमध्ये 13 हजार 772 नवीन प्रकरणे आढळली आहेत.

तर महाराष्ट्रात 9 हजार 83 प्रकरणे आढळली आहेत. याशिवाय तामिळनाडूमध्ये एका दिवसात 3 हजार 211 प्रकरणे आढळली आहेत. आंध्र प्रदेशात एक दिवसात 2 हजार 982 आणि आसाममध्ये 2 हजार 644 प्रकरणे आढळली आहेत.