उद्योजक व्हा तर असे...जवळ-जवळ ३० लाखांचं उत्पन्न देणारा प्रोजेक्ट, आणखी कर्जावर २५ टक्के सब्सिडी

पहिल्यांदा गुंतवणुक करताना किंमत जास्त असू शकते, पण पुढच्या वेळी पायाभूत सुविधांसाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत.

Updated: Jul 10, 2021, 05:22 PM IST
उद्योजक व्हा तर असे...जवळ-जवळ ३० लाखांचं उत्पन्न देणारा प्रोजेक्ट, आणखी कर्जावर २५ टक्के सब्सिडी title=

मुंबई : कमी खर्चात जास्त पैसे कोणाला कमवायचे नसतात? अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला अशा व्यवसायाबद्दल सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकतात. हा व्यवसाय पोल्ट्री फार्मिंगचा आहे. ज्यामुळे केवळ कमी पैशातच तुम्हाला जास्त परतावा मिळत तरआहे. त्याच बरोबर याला वेळही कमीच लागणार आहे. म्हणजे अगदी कमी काळात तुम्ही कमी पैशे टाकून जास्त पैसे कमावू शकतात..

कोरोना काळात एक वेळ अशी आली होती की, पोल्ट्री फार्म व्यवसायावर त्याचा खूप परिणाम झाला होता, परंतु सरकारने सक्रिय भूमिका बजावत लोकांमधील संभ्रम मिटविला आणि त्यानंतप आता पुन्हा कोंबडीच्या अंड्यांना आणि कोंबडीला चांगली मागणी आली. या व्यवसायात चांगली गोष्ट अशी की, पोल्ट्री फार्म व्यवसायात अनुदान देखील उपलब्ध आहे.

पोल्ट्री फार्म बिझिनेस लोनवरील अनुदान सुमारे 25 टक्के आहे. एससी-एसटी प्रवर्गास प्रोत्साहित करण्यासाठी हे, अनुदान 35 टक्क्यांपर्यंत असू शकते. या व्यवसायातच काही रक्कम गुंतवावी लागते आणि उर्वरित रक्कम बँकेतून घेता येते.

आता आपल्याला किती कर्ज लागेल, हे आपण किती मोठ्या पोल्ट्री फार्म उघडत आहात, यावर अवलंबून आहे. पहिल्यांदा गुंतवणुक करताना किंमत जास्त असू शकते, पण पुढच्या वेळी पायाभूत सुविधांसाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार नाहीत, तर मग खर्चही कमी होईल.

कुक्कुटपालनामुळे तुम्हाला किती फायदा होईल हे बर्‍याच गोष्टींवर अवलंबून आहे. जसे आपण पोल्ट्री फार्ममध्ये ब्रॉयलर कोंबडीची विक्री करणार आहात किंवा अंडी व्यवसाय करणार आहात यावर तुमचा फायदा वेगवेगळा असेल.

आपण 10 हजार कोंबडीचा व्यवसाय सुरू करू शकता. ब्रॉयलर कोंबडीचे वजन सुमारे 35-40 दिवसात 1 किलो पोहोचते आणि तिला तुम्ही त्यानंतर विकू शकता. नाबार्डच्या म्हणण्यानुसार आपण ब्रॉयलर कोंबडीच्या व्यवसायातून सुमारे 6 ते 8 लाख रुपयांचा नफा मिळवू शकता.

अशाप्रकारे तुम्ही वर्षात कोंबडीची विक्री सुमारे 6 वेळा करू शकता. अशा प्रकारे, आपण ब्रॉयलर व्यवसायातून वर्षात 30 लाख रुपयांपर्यंत नफा मिळवू शकता.

दुसरीकडे, जर आपण अंडी विक्री करण्याचा व्यवसाय केला, तर ही मिळकत बदलू शकते. कोंबडी 4-5 महिन्यांत अंडी घालण्यास सुरवात करतात. जर तुम्ही फक्त 10 हजार कोंबडींचा व्यवसाय सुरू केला. तर पहिल्याच वर्षी तुम्ही 35 लाख रुपयांची अंडी विकू शकता. त्याचबरोबर, त्या कोंबड्यांना विकून देखील तुम्ही पैसे कमावू शकता. त्यातून तुम्ही 5 ते 7 लाख रुपये कमावू शकता. यासाठी एकूण खर्च 25-28 लाख रुपये असेल. म्हणजेच, एका वर्षामध्ये तुम्ही 12-15 लाख रुपये नफा कमवू शकता.

हा व्यवसाय कमी जमीन आणि कमी भांडवलाने देखील सुरू केला जाऊ शकतो. त्याचवेळी, आपण जितका मोठा व्यवसाय कराल तितकी जमीन आणि भांडवलाची तुम्हाला आवश्यकता असेल. व्यवसाय जितका मोठा होईल तितका खर्च आणि जास्त नफा. कुक्कुटपालनात, कोंबडीची पिल्ले चांगल्या दर्जाचे असावेत, त्यांच्या मृत्यूंचा दर 3 टक्क्यांपेक्षा जास्त नसावा याची काळजी घेतली पाहिजे.

एका कोंबडीसाठी सुमारे दीड चौरस फूट जागा आवश्यक आहे. व्यवसाय जितका मोठा होईल तितक्या कोंबड्या तुम्ही जास्त घेऊ शकतात. तसेच पिल्लांना पौष्टिक आहार द्या, योग्य प्रकाशयोजना सुनिश्चित करा, स्वच्छतेकडे दुर्लक्ष करू नका आणि महत्त्वाचे म्हणजे ते तयार होण्यापूर्वी त्यांची विक्री करण्याची व्यवस्था करा.

कडकनाथ कोंबड्यांची एक प्रजाती आहे. ही कोंबडी पूर्णपणे काळी असते आणि त्यांचे मांसही काळे असते. त्यांची अंडी फिकट गुलाबी रंगाची असतात. कडकनाथ कोंबडीचे अनेक आरोग्य फायदे देखील आहेत. हाय बीपी असलेल्या आणि वृद्धांसाठी हे खूप फायदेशीर आहे. आरोग्यासाठी होणाऱ्या फायद्यामुळे, त्याची किंमत देखील प्रति किलो 1 हजार ते 1 हजार 200 रुपयांपर्यंत आहे.