मुंबई : केंद्र शासित प्रदेश पुडुच्चेरीने काही काळाकरता शाळा खुल्या करण्याच्या आपल्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. प्रदेशात नुकतेच कोरोना संक्रमित 20 मुलं रूग्णालयात दाखल झाली आहे. यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने मागे घेतला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस शाळा बंदच राहणार आहेत. (20 Children in Puducherry hospitalised after testing positive for Coronavirus )
The government had earlier decided to re-open schools and colleges, but now we have decided to postpone it due to the current COVID19 situation. We will announce the opening of educational institutions and colleges later: Puducherry Education Minister pic.twitter.com/qw1zHiFl8Z
— ANI (@ANI) July 15, 2021
पद्दुचेरीमध्ये 16 जुलैमध्ये शाळा पुन्हा सुरू करायच्या होत्या. प्रदेशात 9 ते 12 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे वर्ग खुले करणार होते. सरकार कोरोनाचा वाढता धोका पाहता शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर पुर्नविचार करत आहे. स्थिती अनुकूल झाल्यानंतर पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाईल. याचा तारखा घोषित केल्या जातील.
महाराष्ट्रातही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रात अहमदनगर जिल्ह्यात तसेच मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यात या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात अखेर शाळेची घंटा वाजली आहे. (Maharashtra School reopens) मात्र महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असं असताना पद्दुचेरीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
परभणी जिल्ह्यात आज अखेर शाळेची घंटा वाजली. राज्य शासनाने आजपासून 8वी ते 12 वीच्या शाळा उघडण्यास परवानगी दिली आहे. परभणी जिल्ह्यात 843 शाळांपैकी कोरोनाचे सर्व नियम पाळून 500 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. लातूर जिल्ह्यातही काही ठिकाणी शाळा भरली आहे. निलंगा तालुक्यातील दापका येथील जय भारत विद्यालयात 8वी ते 10 वीचे वर्ग भरले.