बीएसएफ ने जप्त केले १९ पॅकेट हेरॉइन

बीएसएफच्या १७० बटालियनने राबविलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर हेरॉइन जप्त करण्यात आले आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Jan 7, 2018, 11:40 PM IST
बीएसएफ ने जप्त केले १९ पॅकेट हेरॉइन title=

नवी दिल्ली : बीएसएफच्या १७० बटालियनने राबविलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणावर हेरॉइन जप्त करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, बीएसएफच्या १७० बटालियनने आदिया पोस्टाजवळ सर्च ऑपरेशन राबवले. या वेळ हेरॉईनची १९ पाकिटे जप्त केली आहेत. सर्व पाकीटे ही अर्धा किलोची आहेत. सर्व पाकीटांचा विचार करता साधारण ९ किलो हेरॉईन असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत साधारण ४७ कोटी रूपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हे हेरॉईन नेमके कोणी पाठवले होते. ते कोठे घेऊन जाण्यात येत होते. तसेच, नेमके कोणत्या स्थळी पोहोचवण्यात येत होते याबाबत माहिती मिळू शकली नाही. याबाबतचा तपास अद्याप सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.