पोटात दुखतं म्हणून मुलीला दवाखान्यात नेलं, रिपोर्ट पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली

 मुलीच्या पोटात दुखत असल्याने घरच्यांनी तिला रूग्णालयात नेलं. पण जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा....

Updated: Aug 9, 2022, 07:17 PM IST
पोटात दुखतं म्हणून मुलीला दवाखान्यात नेलं, रिपोर्ट पाहून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली title=

Crime News : मुलीच्या पोटात दुखत असल्याने घरच्यांनी तिला रूग्णालयात नेलं. पण जेव्हा डॉक्टरांनी तिला तपासलं तेव्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डॉक्टरांनी अल्ट्रा साऊंडने पोट तपासलं तेव्हा घरच्या लोकांच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण पीडित मुलगी ही दोन महिन्यांची गर्भवती राहिली होती.

उत्तर प्रदेशमधील कौशांबी जिल्ह्यामधील हे प्रकरण आहे. पीडितेला जेव्हा विश्वासात घेऊन तिला विचारणा करण्यात आली. तेव्हा गावामधील एका 40 वर्षाच्या नराधमाने तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत असल्याचं समोर आलं. अनेक दिवसांपासून नराधम या मुलीला धमकी देत पीडितेवर अत्याचार करत होता. पीडितेच्या पोटात दुखू लागल्यानंतर हा प्रकार समोर आला.

पीडितेने आपल्या वडिलांना सांगितलं की, शेजारच्या व्यक्तीने माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि मला धमकी दिली की जर मी घरी सांगितलं तर आई-वडिलांना मारून टाकेल.

दरम्यान, पीडितेच्या वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जात नराधमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपी नराधमाला अटक केली आहे.