अहमदाबादमध्ये 36 तासांत 11 अर्भकांचा मृत्यू

गुजरातचं सर्वात मोठं शहर असणाऱ्या अहमदाबादमध्ये गेल्या 36 तासात सरकारी रुग्णालयात 11 अर्भकांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडालीय. या प्रकरणी मुख्यमंत्री विजय रुपाणींनी चौकशीचे आदेश दिलेत.  

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Oct 30, 2017, 04:03 PM IST
अहमदाबादमध्ये 36 तासांत 11 अर्भकांचा मृत्यू title=

अहमदाबाद : गुजरातचं सर्वात मोठं शहर असणाऱ्या अहमदाबादमध्ये गेल्या 36 तासात सरकारी रुग्णालयात 11 अर्भकांचा मृत्यू झाल्यानं एकच खळबळ उडालीय. या प्रकरणी मुख्यमंत्री विजय रुपाणींनी चौकशीचे आदेश दिलेत.  

हलगर्जीपणा झाल्याचं निष्पन्न झालं कठोर कारवाईचं आश्वासन  रुपाणींनी काल या रुग्णालायाला भेट दिल्यावर दिलंय. मृत्यूचं कारण जन्मच्या वेळी अर्भकांचं वजन अत्यंत कमी असल्याचं सांगितलं जातंय. 

गेल्या तीन दिवसात 20 अर्भकांचा मृत्यू झाल्याचं रुग्णालयातील डॉक्टरांनी मान्य केलंय. रुग्णालयानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात गर्भवती महिलांचं कुपोषण हेच अर्भकांच्या मृत्यूचं कारण असल्याचं म्हटलं आहे. शिवाय अहमदाबादच्या सरकारी रुग्णालयात दररोज सरासरी पाच ते सहा अर्भकांचा मृत्यू होत असतो अशी आकडेवारीही देण्यात आलीय.