राज्यातील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार - गडकरी

राज्यातील रखडलेल्या १०८ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकार १३ हजार ६५१ कोटी रूपये देणार आहे.

Updated: Jul 18, 2018, 06:17 PM IST

नवी दिल्ली : राज्यातील रखडलेल्या १०८ सिंचन प्रकल्पांना केंद्र सरकार १३ हजार ६५१ कोटी रूपये देणार आहे. त्यामुळं राज्यातील सिंचना प्रकल्पांना वेग येणार आहे. या प्रकल्पांसाठी नाबार्डकडून ९ हजार ८२० कोटी रूपये कर्ज घेतलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. राज्यातील हे १०८ सिंचन प्रकल्प मे महिन्या पर्यंत पूर्ण केले जाणार असून त्यामुळं  राज्यातील १० लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे.