१५ दिवसात १ लाखावरुन २ लाखांवर गेली कोरोना रुग्णांची संख्या

१५ दिवसात दुप्पट झाली कोरोना रुग्णांची संख्या

Updated: Jun 4, 2020, 06:38 PM IST
१५ दिवसात १ लाखावरुन २ लाखांवर गेली कोरोना रुग्णांची संख्या title=

मुंबई : देशातील कोरोना रूग्णांची संख्या 2 लाखांच्या वर गेली आहेत. आश्चर्य म्हणजे केवळ १५ दिवसांत रूग्णांची संख्या एक लाखांवरून २ लाखांवर गेली आहे. देशात एक लाख रुग्ण १०८ दिवसात आढळले होते. पण पुढील एक लाख रुग्ण फक्त १५ दिवसात वाढले. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे.

१९ मे रोजी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या अहवालानुसार, देशातील कोरोना रूग्णांची संख्या १ लाख १ हजार १३९ होती. तर ३१६३ लोकांचा मृत्यू झाला होता. १५ दिवसानंतर आज देशातील एकूण कोरोनाचे रुग्ण २ लाखांच्या वर गेले आहेत. म्हणजेच, आता देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचं प्रमाण १५ दिवस आहे.

आरोग्य मंत्रालयाने ३ जून रोजी दिलेल्या अहवालानुसार देशात एकूण रूग्णांची संख्या २ लाख ७ हजार ६१५ आहे. यापैकी ५ हजार ८१५ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरूद्धच्या लढाईत जवळपास ५० टक्के म्हणजेच १ लाख ३०३ रूग्णांनी मात केली आहे. सध्या देशात एकूण १ लाख १ हजार ४९७ रुग्ण उपचार घेत आहेत.

रुग्णांची वाढ

19 मे - 101,139 रुग्ण - 3,163 मृत्यू.

20 मे - 106,750 रुग्ण - 3,303 मृत्यू.

21 मे - 112,359 रुग्ण - 3,435 मृत्यू.

22 मे - 118,447 रुग्ण - 3,583 मृत्यू.

23 मे - 125,101 रुग्ण - 3,720 मृत्यू.

24 मे - 131,868 रुग्ण - 3,867 मृत्यू.

25 मे - 138,845 रुग्ण - 4,021 मृत्यू.

26 मे - 145,380 रुग्ण - 4,167 मृत्यू.

27 मे - 151,767 रुग्ण - 4,337 मृत्यू.

28 मे - 158,333 रुग्ण - 4,531 मृत्यू.

29 मे - 165,799 रुग्ण - 4,706 मृत्यू.

30 मे - 173,763 रुग्ण - 4,971 मृत्यू.

31 मे - 182,143 रुग्ण - 5,164 मृत्यू.

1 जून - 190,535 रुग्ण - 5,394 मृत्यू.

2 जून - 198,706 रुग्ण - 5,598 मृत्यू.

3 जून - 207,615 रुग्ण - 5,815 मृत्यू.

कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीत सुद्धा बरे होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 19 मे पर्यंत 39 हजार लोक बरे झाले. म्हणजेच 19 मे पर्यंत रिकव्हरी दर 40 टक्के होता, तर 3 जूनपर्यंत 2 लाख रुग्ण झाल्यानंतर एक लाखाहून अधिक रुग्णांनी कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकले आहे. याचा अर्थ असा की रिकव्हरी रेट दर 50 टक्क्यांच्या जवळपास पोहोचला आहे