Video : तस्करीची पद्धत पाहून माराल डोक्यावर हात; अधिकाऱ्यांनी जप्त केलं 1 किलो सोनं

तब्बल 1 किलो 38 ग्रॅम सोने सीमाशुल्क विभागाने जप्त केले आहे

Updated: Nov 5, 2022, 02:13 PM IST
Video : तस्करीची पद्धत पाहून माराल डोक्यावर हात; अधिकाऱ्यांनी जप्त केलं 1 किलो सोनं title=

तामिळनाडू : देशभरात सोन्याच्या वाढत्या किमतीमुळे अनेक लोक परदेशातून स्वस्तात सोने बेकायदेशीरपणे आणण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी सीमाशुल्क विभागाच्या (Customs) तत्परतेमुळे देशात छुप्या मार्गाने आणले जाणारे सोने (Gold) अनेकदा जप्त केल्याच्या बातम्या समोर येतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केली जाते. मुंबई (Mumbai Airport), दिल्ली यासह तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) अनेकदा अशा घटना उघडकीस आल्याचे आपण पाहिलंही असेल. 

ज्या पद्धतीने हे सोनं (Gold) आणलं जातं त्या पद्धती सर्वांनाच कायम आश्चर्यचकित करत असतात. कधी कपड्यांमध्ये (cloths) तर कधी शरीरावरील कोणत्यातरी भागावर चिकटवून किंवा कोणत्या तरी सामानात दडवून हे सोनं आणलं जातं. पण तामिळनाडूच्या (Tamil Nadu) चेन्नई विमानतळावरील (Chennai airport) सोनं लपवण्याच्या पद्धतीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. चेन्नई विमानतळावर कोलंबोतून (Colombo) आलेल्या प्रवाशाच्या ट्रॉली सूटकेसच्या बाहेरील भागात लपवून ठेवलेले 46.24 लाख रुपये किमतीचे 1038 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. तामिळनाडूमधील चेन्नई विमानतळावर तैनात असलेल्या सीमाशुल्क विभागाने (Customs) ही माहिती दिली.

कोलंबोमधून आलेल्या या प्रवाशाने कोणाच्याही हाती लागणार नाही अशा प्रकारे हे सोनं आपल्या बॅगेत लपवलं होतं. मात्र सीमाशुल्क विभागाच्या तावडीतून ती व्यक्ती वाचू शकली नाही. सीमाशुक्ल विभागाने सोने तस्करीचा हा व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमधून तब्बल 1 किलो सोने काढण्यात आलं आहे. बॅगेच्या चैनीच्या मागे हे सोने दडवण्यात आले होते. तारेच्या स्वरुपात हे सोने बॅगेत लपवण्यात आलं होतं.

पाहा व्हिडीओ : 

दरम्यान या आधीही विमानतळांवर योग्य कागदपत्रांशिवाय 20 लाखांपेक्षा जास्त किमतीचे सोने घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना अटक केली जाते. दुसरीकडे, यापेक्षा कमी किमतीचे सोने असल्यास प्रवाशांना इशारा देऊन सोडले जाते.