मुंबई : तरूणपणात तुम्ही करत असलेल्या काही चूकांमुळे पुढे आयुष्यभर त्याचा त्रास होण्याची शक्यता असते. म्हणूनच काही चांगल्या सवयी तुम्ही सुरूवातीपासून आजमवल्यास भविष्यात त्याचा त्रास होत नाही. त्यामुळे आजपासूनच या सवयी तुम्हांला असल्यास त्यापासून परावृत्त व्हा.
अनेकांना सकाळी उठल्यावर अतिशय गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते. अशामुळे चेहर्यावरील अकाली सुरकुत्यांचा त्रास वाढतो.
अनेकदा सकाळी लोकांची घाई गडबड असते. त्यामुळे धकाधकीच्या जीवनात लोकं वेळेत नाश्ता करत नाही. यामुळे तुम्ही विनाकारण तुम्ही अनेक तास उपाशी राहता. यामुळे शरीराला मुबलक एनर्जी / उर्जा मिळत नाही. यामधूनच काही आजारांचा धोकाही वाढतो.
अनेक तरूणांना रात्री विनाकारण जागण्याची सवय असते. यामुळे नकळत आपल्यावरील ताण वाढतो. हळूहळू या सवयीमधून तुमची दिवसाची सुरूवातही तणावाने होते. यामुळे पचनाचा त्रास वाढणे, अपचन होणं हा त्रास अधिक वाढतो.
काही लोकांमध्ये सकाळी उठताच सिगारेट पिण्याची सवय असते. यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतो.