World Malaria Day News In Marathi: डेंग्यू, मलेरिया यासारखे आजार डास चावल्यामुळे होतात हे सर्वांना माहित आहे. मलेरिया यासारखे आजार टाळता येण्याजोगा आणि पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. पण तरीही मलेरियाच्या नावाने आजही धडकी भरते. त्याला कारणही तसेच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार मलेरियाने दर दुसऱ्या मिनिटाला एका मुलाचा मृ्त्यू होतो. तर दरवर्षी मलेरियाच्या 20 कोटी प्रकरणांची नोंद होते.
गेल्या दशकात मलेरिया निर्मूलनासाठी अनेक प्रयत्न केले गेले. 2015 पासून मलेरियाविरोधी मोहीम सुरू करण्यात आली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने 2018 मध्ये आपला 'ग्लोबल मलेरिया रिपोर्ट' सादर केला. ताज्या माहितीनुसार, 2015 ते 2017 किंवा या दोन्ही वर्षांत मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत कोणतीही घट झालेली नाही. 25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस म्हणून साजरा केला जातो. तर दुसरीकडे सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षात मलेरियामुळे 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 72 हजारांपेक्षा अधित रुग्णांना मलेरियाची लागण झाली आहे. हा आजार झाल्यानंतर त्याची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा हा आजार जीवघेणा ठरत असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
डास चावल्यामुळे मलेरिया हा आजारा असून अॅनाफिलीस डासाच्या प्रजातीमधील मादी डासामुळे होतो. ही मादी डास साठवलेल्या पाण्यामध्ये वास्तव्य करुन अंडी घालत असल्यामुळे या आजाराचा त्रास होऊ नये म्हणून या डासांची उत्पती स्थळे नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. या आजारांमध्ये रुग्णाच्या शरीरात रक्तामधील प्लेटलेटस देखील कमी प्रमाणात होतात. काही वेळा उपचाराचा भाग म्हणून बाहेरुन सुद्धा प्लेटलेस दिल्या जातात.
मलेरिया हा दसाच्या त्यामुळे होणारा रोग आहे आणि मादी दास प्रदूषित पाण्यात उगवत असल्याने किंवा नवीन प्रजातींना धोका निर्माण झाल्यामुळे किंवा दासची प्रजनन स्थळे नष्ट होऊ नयेत म्हणून परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. किंवा आजारांमध्ये रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या कमी होते. कधीकधी उपचाराचा भाग म्हणून प्लेटलेट्स देखील दिले जातात.
ताप, डोकेदुखी आणि थंडी ही मलेरियाची प्राथमिक लक्षणे असून मलेरियाचा डास चावल्यानंतर 10-15 दिवसांत ही लक्षणे दिसतात. ही लक्षणे कधीकधी सुप्त किंवा कमी तीव्रतेची असतात आणि पटकन लक्षात येत नाही. मात्र, त्यावर चोवीस तासात उपचार न केल्यास जीवाला धोकाही निर्माण होऊ शकतो.
पाच वर्षाखाली मुलांना मलेरियाचा सर्वाधिक धोका असतो. 2017 साली जगभरात मलेरियाने झालेल्या मृत्यूंमध्ये 61 टक्के प्रमाण हे पाच वर्षांखालच्या मुलांना होता. तसेच गरोदर महिला आणि रोगप्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या देखील मलेरिया होण्याची शक्यता जास्त असते.