Women Health : 'या' 5 सवयींचा महिलांच्या Period Cycle वर होतो परिणाम, त्या आत्ताच सुधारा

जाणून घेऊया कोणत्या अशा सवयी आहेत ज्या मासिक पाळीत अडथळा ठरतात.

Updated: Jun 15, 2022, 10:38 PM IST
Women Health : 'या' 5 सवयींचा महिलांच्या Period Cycle वर होतो परिणाम, त्या आत्ताच सुधारा title=

मुंबई : महिलांना मासिक पाळीसंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळी उशिरा येणे किंवा अनेक महिने न येणे हे देखील त्रासाचे कारण बनते. मासिक पाळीत काही महिन्यांचे अंतर असल्यास आणि मासिक पाळी बिघडायला लागली तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. खरं तर,  मासिक पाळी कालावधीत बदल होणं हे काही वाईट सवयींचे लक्षण असू शकते. त्यामुळे मुलींनी या सवयी सोडून, द्याव्यात अन्यथा ही समस्या काळानुसार वाढू शकते.

जाणून घेऊया कोणत्या अशा सवयी आहेत ज्या मासिक पाळीत अडथळा ठरतात.

खूप झोपणे

अमेरिकन मॉडेल रेचेल फिंचने खुलासा केला की, तिला तिच्या करिअरच्या सुरुवातीला जवळपास 12 तास झोपण्याची सवय होती. या सवयीमुळे त्याच्या जीवनशैलीवर अनेक विपरीत परिणाम झाले, त्यापैकी एक म्हणजे दीर्घकाळ मासिक पाळी न येणे.

वजनात बदल

जेव्हा वजन अचानक वाढू लागतो, तेव्हा त्याचा परिणाम मासिक पाळीवर देखील होतो. झपाट्याने वजन कमी झाल्यामुळे किंवा वाढल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात, ज्यामुळे पीरियड सायकल देखील बदलू शकते. म्हणजेच जर तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त व्यायाम करत असाल किंवा तुमच्या वजनाकडे अजिबात लक्ष दिले नाही, तर तुमची मासिक पाळी देखील अनियमित होऊ शकते.

आहारात अडथळा

उत्तम आहार हे उत्तम आरोग्याचे रहस्य आहे. जर तुमचा आहार योग्य नसेल, तर त्याचा फटका तुमच्या शरीराला सहन करावा लागतो. जरी तुम्ही बाहेरचे जंक फूड जास्त खाल्ले किंवा तुमच्या आहारात आवश्यक पोषक तत्वांचा समावेश केला नाही, तरीही तुमची मासिक पाळी वेळेवर येत नाही.

गर्भनिरोधक

अनेक मुली गर्भधारणा टाळण्यासाठी लग्नाआधी गर्भनिरोधक गोळ्या जास्त प्रमाणात सेवन करतात. गर्भनिरोधक किंवा गर्भनिरोधक गोळ्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात, ज्यामुळे अनियमित मासिक पाळीची समस्या देखील उद्भवते.

ताण

तणावामुळे शरीराचे नुकसान होते. आरोग्यासाठी हानीकारक ताण देखील पीरियड सायकलवर परिणाम करू शकतो. तणाव कमी करणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे, अन्यथा मासिक पाळीवर त्याचा परिणाम वेगवेगळ्या प्रकारे दिसून येतो.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)